दुसरी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

दुसरी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी : शिक्षण मंत्र्यांची घोषणा

दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ नंतर भरवली जाणार अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करणार अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. याविषयी सविस्तर माहिती अशी

हे ही वाचा

18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार !

दुसरीपर्यंतच्या मुलांची उत्तम प्रकारे झोप पूर्ण व्हावी म्हणून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी नवीन शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ नंतर भरेल अशी घोषणा केलीआहे. परंतु याबाबत अंतिम निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नसून तो लवकर घेतला जाणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मुलांची झोप पूर्ण व्हावी याबाबत सूचना केली होती.

बदलत्या काळाप्रमाणे मुलांना लवकर म्हणजेच पहाटे उठण्याची सवय नसते म्हणून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास उशीर होत असतो या सर्व बाबी लक्षात घेता मुलांची सकाळी लवकर झोप पूर्ण होत नाही. म्हणून सरकारने उशिरा शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा असे राज्यपाल रमेश बैस यांनी अलीकडे सुचवले होते.

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक च्या महाव्यवस्थापक पदाची भरती

राज्यपालांच्या या निर्णयाशी सरकारने संमती दर्शवली आहे, मात्र हा निर्णय एकट्याने घेणे योग्य नसल्याने यासाठी तज्ञांची समिती स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मनोवैज्ञानिक,बालरोग तज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर घेतला जाईल,असे  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

  सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळाच्या मुलांना हा नियम पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू असेल असे ते म्हणाले. सकाळ सत्रातील शाळा सात ऐवजी नऊ पर्यंत पुढे ढकलल्यामुळे या लहान मुलांची झोप पूर्ण होईल व त्यांना अभ्यासाची व शाळेची गोडी निर्माण होईल असे स्पष्टपणे दीपक केसरकर यांनी सांगितले.

हे ही वाचा

दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा : नाशिक महानगरपालिका

पूर्व प्राथमिक विभाग

1. बालवाडी,छोटा गट,मोठा गट हे वर्ग निर्माण करून ती मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

2. आता बालवाडी ते दुसरी या सर्व वर्गाला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.

Leave a Comment