दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा : नाशिक महानगरपालिका

दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा नाशिक महानगरपालिकेचे आवाहन,न्यायालय निर्णय,सविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल्स इत्यादीना महानगरपालिकेतर्फे जाहिर आवाहन करण्यात येते, आपली दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावीत याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

हेही वाचा : शिवाजीनगर मनपा शाळा क्र. 35 मध्ये विद्यार्थिनींनी बनवले हातातील ब्रेसलेट !

मा.उच्च न्यायालय व मा. सर्वोच्या न्यायालयच्या निर्णय/आदेशा प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासनाकडील उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन, अधिनियम, २०१७ क्रमांक मदुवआ-०६/२०२२/प्र.क्र.१००/कलम-१०- व्दारे, दि. २२/०२/२०२३ पासून त्यांच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रांमध्ये नामफलक मराठी भाषेत असण्या संबंधित असणाऱ्या उक्त अधिनियमाच्या कलम ३६ (क) च्या तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल,

हेही वाचा : “सखी सावित्री” शालेय शिक्षण विभागाच्या समिती बाबत थोडक्यात माहिती

अशा आस्थापनांकडे मराठी देवनागरी भाषेसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील, परंतू अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी ‘भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
सबब, सदर अधिनियमानुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व दुकाने व आस्थापना धारकांनी त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे.

ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत आढळून येणार नाहीत, त्यांच्या आस्थापनेवर मा. न्यायालयाच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
तरी, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल्स इत्यादीना महानगरपालिकेतर्फे जाहिर आवाहन करण्यात येते, नामफलक मराठी भाषेत करणेत यावे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत नसतील अशा आस्थापना धारकांना मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या आस्थापनांवर प्रत्येक कामगार प्रमाणे रु. २०००/- (अक्षरी- दोन हजार रुपये मात्र) अशी दंडात्मककारवाई करण्यात येईल, तरी सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment