ध्रुवनगर मनपा शाळेतील उपशिक्षिका लता सोनवणे यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.

ध्रुवनगर मनपा शाळेतील उपशिक्षिका लता सोनवणे यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न याविषयी सविस्तर वृत्तांत

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील सातपूर विभागातील शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेत कार्यरत असणाऱ्या उपशिक्षिका लता सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा 26 एप्रिल 2025 रोजी गंगापूर रोड वरील मोहनलाल हॉटेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हा सेवापूर्ती सोहळा लता सोनवणे यांच्या कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेला होता. श्रीमती लता सोनवणे यांची शैक्षणिक यात्रा खूप मोठी संघर्षमय आहे. सुरुवातीला त्या अनुकंपा तत्वाखाली कामगार नगर येथील मनपा शाळेमध्ये रुजू झाल्या, त्यानंतर त्यांची बदली प्रबुद्ध नगर येथे असलेल्या मनपा शाळेमध्ये झाली. त्यानंतर त्यांची शेवटची बदली झाली ध्रुवनगर मनपा शाळेमध्ये. आणि त्या इथेच 31 मे 2025 रोजी आपल्या शिक्षक वृत्तीचा सेवा प्रवासाचा शेवट करत आहेत.

हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने होणार

श्रीमती लता सोनवणे यांच्याकडे पाहिल्यानंतर असे वाटते की सेवानिवृत्ती ही केवळ कागदपत्रे असते, आज ही त्यांच्यामध्ये   शिक्षणाबाबत प्रचंड उर्जा दिसून येते. लता सोनवणे यांच्या प्रवासाची सुरुवात एक सामान्य शिक्षिका म्हणून जरी झाली तरी त्यांच्या असामान्य कार्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहिल्या.

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती नितांत तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.त्यांचा स्वभाव जरी कठोर असा वाटणारा जरी असला तरी प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव तसा नाही.वरून नारळासारखा कडक, फणसासारखा काटेरी वाटणारा स्वभाव आहे पण आत मात्र फणसाचे गरे आणि नारळ खोब- या सारखा आहे.

हे ही वाचा: शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रिकरण

त्यांनी केवळ विषय शिकवले नाहीत, त्यांनी माणसं घडवली, विद्यार्थी घडवले, स्वप्न रुजवली आणि त्यांना उंच भरारी घ्यायला शिकवलं. विद्यार्थ्यांशी असलेलं नातं हे शिस्तीतून प्रेम देणारे आणि प्रेमातून शिस्त लावणारे होते. विद्यार्थ्यांनी चूक केल्यानंतर त्या रागवायच्या पण त्यांचं रागवणे हे केवळ त्यांच्या भविष्यासाठी होतं.

शाळेतील सहकारी शिक्षकांसाठी लता सोनवणे म्हणजे मार्गदर्शक,सल्लागार आणि हक्काची व्यक्ती. कधी शब्दांनी, कधी कृतीने, तर कधी शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी अनेकांना दिलासा दिला आहे.त्यांचा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो आणि म्हणूनच त्यांचं मत प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं.

हे ही वाचा: Anganvadi: राज्यात शाळांशी लिंक होणार 1 लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्र

शाळेच्या प्रत्येक कामात अगदी लहान गोष्टी पासून ते मोठ्या उपक्रमापर्यंत त्यांचा सहभाग ठाम असायचा. त्यांनी कधी माझं काम एवढेच म्हणत सीमारेषा आखल्या नाहीत. त्यांनी शाळा ही संस्था नाही तर आपलं घर मानलं आणि तितक्याच निष्ठेने ते जपलं. लता सोनवणे केवळ शिक्षिका नसून त्या एक संस्कार संपन्न शक्ती आहेत.

26 वर्षाच्या संघर्षमय सेवेनंतर त्या 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांच्या दोन मुली आणि त्यांचे दोन जावई असे आहे.

गंगापूर रोड वरील हॉटेल मोहन लाल येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. तो कार्यक्रम साडेदहा पर्यंत चालला. श्रीमती लता सोनवणे यांचे आप्तस्वकिय बाहेरगावाहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.

हे ही वाचा: प्रधानमंत्री पोषण शक्ती: योजनेंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा

युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भाऊ पाटील हे सुद्धा लता सोनवणे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा सत्कार सोनवणे परिवाराकडून करण्यात आला. श्रीमती लता सोनवणे यांच्या आप्त स्वकीयांचा सत्कार त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. अनेक मान्यवराकडून लता सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

मनपा शिक्षण विभागातील शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. केंद्राचे केंद्र समन्वयक सौ.पाटील सुद्धा उपस्थित होत्या. त्याचबरोबर माजी केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे हे सुद्धा उपस्थित होते.. महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, सुरक्षारक्षक यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा: मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण आयोजित !

महानगरपालिका शाळा क्रमांक 22 च्या उपशिक्षिका दिपाली काळे आणि उपशिक्षक नामदेव जानकर यांनी श्रीमती लता सोनवणे यांच्या सेवेबद्दल आणि जीवनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

श्रीमती लता सोनवणे यांच्या परिवारातील व नातेवाईकातील अनेक व्यक्तींनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये त्यांच्या दोन्ही मुलींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले.

हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन !

या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक व शिक्षक सुद्धा उपस्थित होते. ज्ञान अज्ञात बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय चांगल्या वातावरणात पार पडला. शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 

Leave a Comment