नाशिक महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन !

नाशिक महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांनी उपस्थित राहणे या विषय सविस्तर वृत्तांत

विषयाच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग, सिमेन्स कंपनी आणि ISPF(Innovation and Science Promotion Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने निवडक नाशिक महानगरपालिकेच्या २२ शाळांमध्ये “जिज्ञासा प्रकल्प” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: जुन्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली

या प्रकल्पांतर्गत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले असून पुढील टप्पा म्हणजे महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासनुसार सदर संस्थेमार्फत परवानगी मागितली आहे. सदर संस्थेलानुसार अर्टीच्या अधीन राहून दि.०२/०४/२०२५ रोजी सकाळ/दुपारी ८ ते ३ या कालावधीत प्रदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

हे ही वाचा: UPS योजना होणार लागू 1 एप्रिल पासून

तरी सोबत जोडलेल्या यादीतीलशाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांना प्रदर्शन स्थळी उपस्थित ठेवावे. विज्ञान प्रदर्शन स्थळी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येत आहे.

१) विज्ञान प्रदर्शन खर्च म्हणजेच मुलांना लागणारे साहित्य हे संस्थेव्दारे पुरविले जाणार आहे.
2) विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना २ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
३) सोबत जोडलेल्या यादीतील शाळा व विद्यार्थ्यांनाच सदर ठिकाणी प्रदर्शनात सहभाग नोंदवता येईल.
४) प्रदर्शनाच्या ठिकाणी सहभागी विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांसाठी चहा, अल्पोपहार व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा: उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना

महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शन रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ नाशिक येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. हा कार्यक्रम दोन एप्रिल 2025 रोजी नाशिक येथे पार पडेल.
सोबतः- शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी.

Leave a Comment