केंद्र सरकारच्या PAB द्वारे ‘खेळ-उड्डाण उत्सव २०२६-२७’ शाळांमधी कला व क्रिडा स्पर्धा आयोजित या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार जाणून घ्या सविस्तर माहिती.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित असून शिक्षणामध्ये कला आणि क्रीडा या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्याची शिफारस करते. शालेय स्तरावर अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रम यांच्यामधील दरी नष्ट करून कला आणि क्रीडा यांना मुख्य प्रवाहातील विषयांच्या बरोबरीने स्थान देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना ओळखणे, त्यांना, प्रोत्साहन देणे आणि स्थानिक संस्कृतीशी त्यांचे नाते घट्ट करणे ही काळाची गरज आहे. शालेय वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी. त्यांच्या मधील कौशल्ये विकसित व्हावीत आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेता कला व क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:नवीन अभ्यासक्रम: सन 2016-27 या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन कार्यपद्धती
याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत नियमितपणे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. याचबरोबर काही जिल्हा परिषदामार्फत जिल्हा परिषद निधीमधून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
केंद्र सरकारच्या PAB (Project Approval Board) द्वारे ‘खेळ-उड्डाण उत्सव २०२६-२७’ (KHEL-UDAAN UTSAV 2026-27) एक उपक्रम मंजूर केला आहे.
यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी प्राथमिक करिता रू.२२.४६९ कोटी आवर्ती तरतूद मंजूर आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळांमधील विदयार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून केंद्रस्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर शालेय कला व क्रिडास्पर्धा आयोजित करण्यात येतील.
याबाबत आवश्यक खर्च मंजूर तरतूदीनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई मार्फत समग्र शिक्षा अंतर्गत अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी मंजूर असणा-या तरतुदीच्या मर्यादेत निधी उपलब्धतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी जिल्हयासाठी व प्रशासन अधिकारी महानगर पालिका (पाच मनपा) यांनी मनपासाठी सोबत जोडलेल्या निकषानुसार कला व क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या खर्चाची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर कण्यात येणार आहे.
स्पर्धा पूर्ण झाल्यावर अहवाल संचालनालयास व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर करावा.
हे ही वाचा: Senior Pay Scale: वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2026
१. स्पर्धा गट, इयत्ता व वयोगट निश्चिती :
विद्यार्थ्यांची इयत्ता व वयोगटानुसार खालीलप्रमाणे दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात येत आहे.
१.१ प्राथमिक गट (Primary): पात्रताः इयत्ता ३ री ते ५ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.
१.२ उच्च प्राथमिक गट (Upper Primary): पात्रता: इयत्ता ६ वी ते ८ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.
सदरची स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळामधील विदयार्थ्यांसाठी राहील. संबंधित जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या वैयक्तिक निधीतून (जि.प.सेस मधून) इतर कला क्रीडा स्पर्धा समाविष्ट करता येतील.
२. कला स्पर्धा:-
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी शालेय स्तरावर कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, मानवी मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख होऊन त्याबद्दल सार्थ अभिमान निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यासाठी खालीलप्रमाणे वैयक्तिक स्पर्धा व सांघिक स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.
हे ही वाचा: District Council: जिल्हा परिषद मुख्याध्यापकांच्या अर्जित रजे विषयी महत्त्वाची माहिती

३. क्रीडा स्पर्धाः
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून, या स्पर्धा केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि निकोप स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करतात. खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास होतोच, शिवाय मानसिक एकाग्रता आणि हार-जीत स्वीकारण्याची प्रगल्भता वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विकास होतो. यासाठी स्पर्धा आयोजनात वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

४. स्पर्धेचे वेळापत्रक
विविध स्तरांवरील स्पर्धेचे आयोजन खालील निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. विहित वेळेत स्पर्धा पार पाडण्यासाठी खालील वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे..

५. स्पर्धा आयोजन
५.१ केंद्र पातळीवरील स्पर्धां प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळामधील विदयार्थ्यांसाठी केंद्र करावे. शासकीय व स्थानिक स्वराज्य पातळीवरील स्पर्धांचे आयोजन
५.२ तालुका पातळीवरील स्पर्धा : एकूण ४०८ (BRC+URC) ग्रामीण भागात प्रत्येक तालुका (BRC) व शहरी भागात (URC) स्तरावर स्पर्धा
नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थी संबंधित तालुक्यात तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील.
५.३ जिल्हा पातळीवरील रचना: एकूण ३६+५= ४१
राज्यातील एकूण ३६ जिल्हे (३४ ग्रामीण जिल्हे मुंबई शहर व मुंबई उपनगर नागरी जिल्हे) यात समाविष्ट आहेत.
‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका ५ महानगरपालिका (पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक आणि नागपूर) यांना जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजनासाठी स्वतंत्रपणे जिल्हा घटक समजण्यात यावे.
याव्यतिरिक्त इतर महानगरपालिका अंतर्गत समाविष्ट URC यांना तालुका घटक समजण्यात येईल. त्यानुसार त्या URC स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील.
६. अंमलबजावणी जबाबदारी
सदर उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्षेत्रानिहाय अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.
६.१ केंद्र स्तरः समूह साधन केंद्र समन्वयक
६.२ तालुका / URC स्तरः गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी
६.३ जिल्हा / मनपा स्तरः शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी
६.४ क्रीडा स्पर्धेशी संबधित नियम क्रीडा व युवक संचालनालय यांचेद्वारे निश्चित केल्या प्रमाणे राहतील.






