मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण आयोजित !

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत सविस्तर वृत्तांत

राज्यातील नोकरी इच्छुक विनाअनुभवी युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नवी मुंबई यांचे दिनांक १७मार्च, २०२५ रोजीच्या V.C. बैठकीत शासकीय / निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालय उन्हाळी सुट्टीमुळे बंद राहणार असल्याने शाळा / महाविद्यालयांमध्ये ०५ महिने कालावधी वाढविण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.

हे ही वाचा: UPS योजना होणार लागू 1 एप्रिल पासून

शासकीय / निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालये इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा ६ महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला आहे. अशा उमेदवारांचा पुढे ५ महिने प्रशिक्षण कालावधी सध्या वाढविण्यात येवु नये, सदर प्रशिक्षण कालावधी वाढविण्याबाबतचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त होताच यथावकाश आपणास कळविण्यात येईल.
सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल.

हे ही वाचा: उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना

१. मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून एकत्रितपणे ११ महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.

२. तसेच, ज्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी येथील शासन निर्णय निर्गमीत होण्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनेत पुनःश्च रुजू करुन घ्यावे (शिक्षण विभाग वगळून). परंतु, यादरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम /नियमित स्वरुपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झालेला असल्यास शासन निर्णयातील उमेदवार पुढे योजनेतंर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन घेण्यास पात्र राहणार नाही.

हे ही वाचा: आयुष्यमान कार्ड काढलं का ? शेतकऱ्यांनो !

३. सदर योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी Certificate Of Incorporation/ उद्यम आधार व EPF/ESIC/GST/DPIT/ यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सादर करावे.

४. शासन निर्णयातील नमुद प्रमाणे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधीत आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना / कार्यालयात यापूर्वी कधीही कायम/तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच, कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होतेवेळी संबंधीत आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहील.

हे ही वाचा: जुन्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली

५. संबंधीत आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधीत इतर आस्थापना / कार्यालयात कायम / तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील.

दोन्ही प्रमाणपत्र संबंधीत आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत या कार्यालयास (सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेकडे) सादर करणे अनिवार्य असेल. (सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना यथावकाश कळविण्यात येईल)

Leave a Comment