18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार !

१८ डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार : अल्पसंख्यांक विकास विभागाचे परिपत्रक

संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. दि.१८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो.

हे ही वाचा :- नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक च्या महाव्यवस्थापक पदाची भरती

दिनांक १८ डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर प्रतिवर्षी “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात यावा. यादृष्टीने या दिनांकास अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.सर्व जिल्हयात शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा :-

हे ही वाचा :- “आठवणीतील कात्रण संग्रह” : नाशिक मनपा उपशिक्षक राहुल कोळी यांचा अनोखा उपक्रम

अ) भित्तीपत्र स्पर्धा

ब) वक्तृत्व स्पर्धा

क) निबंध स्पर्धा

ड) उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके

इ) व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इ.

राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्हयात सूचना देणे कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणे, कार्यक्रमांचे आयोजन मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची असणार आहे. तसेच जिल्हयात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात असणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रकनुसार हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत .

हे ही वाचा:- दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा : नाशिक महानगरपालिका

सदर दिवशी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

सर्व जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकिय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत . यामध्ये खालील बाबींचा मसावेश असावा-

i. भित्तीपत्र स्पर्धा

ii. वक्तृत्व स्पर्धा

iii. निबंध स्पर्धा

iv. उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके

V. व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद, इ.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्याख्याने, चर्चासत्रे इत्यादीद्वारे प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:- शिवाजीनगर मनपा शाळा क्र. 35 मध्ये विद्यार्थिनींनी बनवले हातातील ब्रेसलेट

त्यानुसार वर नमुद शासन परिपत्रकात नमुद केलेनुसार आपिलस्तरावरून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून व त्यासंदर्भातील केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व या कार्यालयास सादर करण्यात येणार आहे .

Leave a Comment