बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या अंतर्गत 100% शासकीय अनुदानावर 30 दिवस प्रशिक्षण आहे आपल्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध याविषयी सविस्तर माहिती.
अनेक ठिकाणी बांबूचा वापर हा होत असतो.जास्त वापर हा बांधकाम,घरामध्ये सजावट करण्यासाठी,जागतिक स्तरावर शेती,पॅकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पर्यावरण संरक्षण,स्वच्छ वातावरण,जागतिक तापमानवाढीचा विचार करताना बांबू हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असे समजून येते.या सर्व प्रकारच्या वापरावरून बांबूचा उपयोग विविध क्षेत्रात होतो. हे या सर्व बाबींवरून लक्षात येते. मुख्य म्हणजे बांबू पासून होम डेकोरेशन साठी खूप विश्वसनीय वस्तू बनवल्या जातात.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत 100 टक्के शासकीय अनुदानावर 30 दिवसाचे प्रशिक्षण असून यामध्ये ‘निवासी बांबू फर्निचर’ प्रशिक्षणासाठी कामगारांसाठी 20 जागा या रिक्त पदी आहेत . ज्या उमेदवाराला बांबू फर्निचर बाबत आवड किंवा ज्यांना उत्कृष्ट कारागिरी करता येते, त्यांनी या संधीचा उपयोग करावा व अर्ज लवकरात लवकर करावेत.
हे ही वाचा
“सखी सावित्री” शालेय शिक्षण विभागाच्या समिती बाबत थोडक्यात माहिती
या प्रशिक्षणासाठी इयत्ता दहावी ही उत्तीर्ण असायला हवे .या प्रशिक्षणाचा प्रवेश अर्ज हा 15/12/2023 पासून सुरू करण्यात आला असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक 31/12/2023 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे.अर्ज हा पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयात दिला तरी चालेल.
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र वनविभागाने काही सूचना व अटी दिला आहेत. त्यात पहिली अट म्हणजे,उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.दुसरी अट ही आहे की,उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र,आधारकार्ड,इत्यादी दस्तऐवज अर्जासोबत जोडण्यात यावेत
हे ही वाचा
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार ? RBI चा नियम.
‘निवासी बांबू फर्निचर’ प्रशिक्षणासाठी जाहिरात महाराष्ट्र वनविभागाने प्रसिद्ध केली आहे.हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन करावा लागणार आहे. या प्रशिक्षणाचे ठिकाण चिचपल्ली चंद्रपूर येथे आहे. अधिक माहितीसाठी brtc.org.in या लिंक वर क्लिक करा.