गणेश लोहार यांनी केली तब्बल सात वेळा नर्मदा परिक्रमा या विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊ या.
Table of Contents
गणेश लोहार यांनी यावर्षी चैत्र महिन्यात रामपुरा – तीलकवाडा – रामपुरा अशी सातवेळा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.
2019 साली गणेश लोहार पिता-पुत्रांनी सायकलवर संपूर्ण 3500 किमी असलेली नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरविले होते, त्याप्रमाणे संपूर्ण नियोजनही झाले होते. परंतु परिक्रमेला निघण्याच्या दोन दिवस आधी त्यांच्या घरी वाईट घटना घडली होती,म्हणून त्यांना नर्मदा परिक्रमेचा बेत रद्द करावा लागला होता.
हे ही वाचा: पुरुषांचे वजन वयानुसार किती असावे ? महत्त्वाची माहिती
2019 साली त्यांनी केलेला संकल्प यावर्षी तब्बल सात वेळा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करून त्यांनी पूर्ण केला . ज्यांना 3500 किमी ची संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही, त्यांनी 21 किमी असलेली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा तीनवेळा केली तरी संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे फळ मिळते, असे नर्मदा पुराणात वर्णन आहे.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात करतात. तीलकवाडा किंवा रामपुरा येथून सुरू करता येते.गणेश लोहार यांनी ही परिक्रमा रामपुरा येथून पहाटे चार वाजता सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्यंत ते दोनवेळा परिक्रमा करीत असत. नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन दुपारी तीन वाजता तिसरी परिक्रमा सुरू करून सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत पूर्ण करीत असत. दिवसाला तीनवेळा ते नर्मदा परिक्रमा पूर्ण करीत असत. दोन दिवसात त्यांनी सहावेळा परिक्रमा पूर्ण करून तिसऱ्यादिवशी सातवी परिक्रमा पूर्ण करून ते सायंकाळी सात वाजता आपल्या बाईकने नाशिक येथे सुखरूप पोहचले.
हे ही वाचा: निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा मार्गावर प्रकाश, बाथरूम, बंदोबस्त, नदीपात्रात संरक्षणासाठी NDRF ची टीम, परिक्रमावासियांसाठी आरामाची व्यवस्था अशी अत्यंत चोख व शिस्तपूर्ण नियोजन गुजरात सरकारने केले होते. परिक्रमा मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्था, गावकरी, आश्रम यांनी चहा, पाणी, नाश्ता, सरबत, कुल्फी, आईस्क्रीम, जेवण इ. गोष्टींची व्यवस्था केलेली होती.
सर्वांचा सेवाभाव पाहून मन भरून आले,नर्मदा मैय्याने अत्यंत रणरणत्या उन्हात गणेश लोहार यांच्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतली, अशी भावना गणेश लोहार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली .
गणेश लोहार यांनी केलेल्या या नर्मदा परिक्रमेबद्दल सम्राट गोकुळधाम सोसायटी रहिवासी, तरुण मित्र मंडळ, आण्णा भांड याचा शेगाववारी ग्रुप, सायक्लिस्टस , मित्र परिवार व अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.गणेश लोहार हे सायकलिस्ट,ट्रेकर व योगसाधक आहेत.त्यांच्या नावावर सायकलिंग चे अनेक विक्रम आहेत.त्याचबरोबर गणेश लोहार हे एक सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक सुद्धा आहेत.