निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प

निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लहान मुलांसाठी उन्हाळ्यात समर कॅम्प आयोजित करण्यात येत असतात. या समर कॅप मुळे मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि यामुळे मुलांना एक वेगळाच अनुभव मिळतो. तसेच मुलांना निसर्गाशी देखील जवळीक साधता येते. या समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांना नवनवीन कौशल्य प्राप्त होतात. पुस्तकांशी मैत्री करता येईल आणि कला अनुभव देखील प्राप्त करता येतील.

हे ही वाचा: सुवर्णसंधी : नवोदय विद्यालय समितीकडून 1377 पदांची भरती

या कॅम्प मध्ये पालकांसाठी खास तज्ञाचे सत्र आयोजित केले जाणार आहे.मुलांना ट्रेकिंग करता येईल, तसेच सर्व मुलांना या कामा मध्ये आनंदाचा अनुभव घेता येणार आहे. मुलांना पौष्टिक खाऊ देखील दिले जाणार असून समर कॅम्प मध्ये दोन गट केले जाणार आहेत.

हे ही वाचा: आईचे नाव बंधनकारक : कोणकोणत्या कागदपत्रांवर ?

गट व तारीख

एक छोट्या गट आणि दुसरा मोठा गट. मोठ्या गटाची वय मर्यादा नऊ ते तेरा वर्षे आहे आणि हा कॅम्प 21 मे 2024 ते 24 मे 2024 पर्यंत असणार आहे. मोठ्या गटाची वेळ सकाळी दहा ते दुपारी साडेतीन पर्यंत असेल आणि मोठ्या गटातील मुलांना लागणारे शुल्क हे 1200 रुपये आहे. छोट्या गटाची वय मर्यादा ही चार ते आठ वर्ष एवढी आहे. लहान मुलांचा कॅम्प 22 मे 2024 ते 24 मे 2024 पर्यंत असणार आहे.

हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार

लहान गटाची वेळ सायंकाळी चार ते सहा असून या गटासाठी लागणारे शुल्क हे पाचशे रुपये एवढे आहे. हा समर कॅम्प निर्मल ग्राम निर्माण केंद्र गंगापूर गाव, नाशिक येथे असणार आहे. या समर कॅम्प मध्ये मुलांची संख्या मर्यादित असल्याकारणाने प्रवेशासाठी लवकरात लवकर 9405177106/9356224531 या नंबर वर संपर्क करावे.

Leave a Comment