सुवर्णसंधी : नवोदय विद्यालय समितीकडून 1377 पदांची भरती याविषयी सविस्तर माहिती
Table of Contents
नवोदय विद्यालय समितीकडून १३७७ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठी अगोदर तारीख 30 एप्रिल 2024 ही होती. परंतु आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायला हवा तो ही सोप्या पद्धतीने आणि या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ही भरती नॉन टीचिंग पदांसाठी सुरू आहे. नवोदय विद्यालय समितीकडून ही भरती राबविण्यात आली आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी 7 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. ही भरती मेगा भरती असून १३७७ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीचा शोध घेत असणाऱ्यांनी लगेच अर्ज करावा.
हे ही वाचा: आईचे नाव बंधनकारक : कोणकोणत्या कागदपत्रांवर ?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर या भरती प्रक्रिये विषयी सविस्तर माहिती मिळेल. काही तांत्रिक कारणांमुळे भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता यामुळे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज भरू शकतात.
हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इलेक्ट्रिशियन, ऑडिट असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवाराची भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला परीक्षा द्यावी लागणार आहे.