साधन केंद्र स्तरावर शिक्षणातील नवप्रवाह समजून केंद्र अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करावयाचे प्रयत्न संदर्भात शिक्षकामध्ये परस्पर संवाद घडून यावा यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते.
- जिल्हास्तरीय उद्बोधन-दि. ३१ जुलै २०२४
- तालुकास्तरीय उद्बोधन दिनांक १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट २०२४
- केंद्रस्तरीय शिक्षण परिषद- दिनांक ५ ऑगस्ट ते ७ऑगस्ट २०२४
Table of Contents
शिक्षण परिषद हे शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण घडवून आणण्याचे एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे. शिक्षण परिषदेमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी उपयुक्त असे विषय घेतले जातात, त्यामुळे शिक्षकांना वर्गात मुलांना अधिक चांगले शिकवण्यास मदत होते तसेच विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता बांधणीस देखील मदत होते.
हेही वाचा : “शिक्षण सप्ताह” बाबत महत्वाची माहिती
या वर्षातील पुढील 7 शिक्षण परिषदांचे नियोजन शिक्षकांच्या आणि मुलांच्या शिकण्याच्या गरजा विचारात घेवून केलेले आहे. चर्चा, प्रात्यक्षिके, फिल्म्स, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक येथील तज्ञांमार्फत तयार केलेल्या व्हिडिओच्या आणि अभ्यासपूर्वक तयार केलेल्या PPT साह्याने शिकण्याचे नियोजन केले आहे. या परिषदा आनंददायी आणि परिणामकारक करण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या भूमिका समजून घेवूया.
शिक्षण परिषदेमध्ये केंद्र प्रमुख यांची भूमिकाः
- शिक्षण परिषद आयोजित करण्याची जबाबदारी ही केंद्रप्रमुख यांची राहील.
- शिक्षण परिषदेचे नियोजन सी. आर. जी. सदस्यांच्या मदतीने एक दिवस आधीच करून ठेवावे.
- केंद्रप्रमुख आणि सी. आर. जी. सदस्यांनी शिक्षण परिषद संचलित करावी.
- एकापेक्षा जास्त केद्रांची शिक्षण परिषद एकत्रित घेऊ नये.
- शिक्षण परिषद प्रभावी होण्यासाठी ती वेळेत सुरू करावी. शिक्षण परिषदेमध्ये शिकलेल्या गोष्टींचा वापर अध्यापन प्रक्रियेत होत असल्याची खात्री शाळाभ करावी.
- अपवादात्मक परिस्थितीत दिलेल्या नियोजनात गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने बदल करू शकता.
शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांची भूमिकाः
- शिक्षण परिषदेसाठी येताना पाठ्यपुस्तक, TLM/शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन येणे.
- शिक्षण परिषदेचा प्रभाव जाणून घेण्यासाठी कृपया सर्व शिक्षकांनी शिक्षण परिषदेच्या पूर्वी “pretest” व शिक्षण
- परिषद संपल्यानंतर “post test” न चुकता भरावी.
- गटचर्चा किंवा प्रात्यक्षिकांमध्ये मनापासून सहभाग घ्यावा. आपले मत किंवा प्रतिक्रिया नेमकेपणाने व थोडक्यात
- मांडाव्यात. शिक्षण परिषदेनंतर इथे शिकलेल्या गोष्टींचा वर्गात वापर कसा करावा यावर सहकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा करावी.
शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांची भूमिकाः
- शिक्षण परिषदेसाठी येताना पाठ्यपुस्तक, TLM/शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन येणे.
- शिक्षण परिषदेचा प्रभाव जाणून घेण्यासाठी कृपया सर्व शिक्षकांनी शिक्षण परिषदेच्या पूर्वी “pretest” व शिक्षण
- परिषद संपल्यानंतर “post test न चुकता भरावी,
- गटचर्चा किंवा प्रात्यक्षिकांमध्ये मनापासून सहभाग घ्यावा. आपले मत किंवा प्रतिक्रिया नेमकेपणाने व थोडक्यात
- मांडाव्यात. शिक्षण परिषदेनंतर इथे शिकलेल्या गोष्टींचा वर्गात वापर कसा करावा यावर सहकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा करावी