Face Reading : व्यक्तीचा चेहरा कसा वाचावा याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
चेहरा वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे ते खालील प्रमाणे
मित्रांनो मानवी चेहरा म्हणजे एक सांकेतिक लिपीच आहे. अर्थात लिपी जितकी तंतोतंत वाचता येते, तितका मानवी चेहरा वाचता येत नसला तरी बऱ्याच अंशी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याच्या भावना,विचार आणि स्वभाव वाचण्याची कला “चेहरामिमांसा किंवा याला “फेस रीडिंग”असेही म्हणून ओळखले जाते. हे शास्त्र व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या लक्षणावरून, त्याचे मानसिक, भावनिक आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू ओळखण्याचा प्रयत्न करते.Face Reading: How to read a person’s face?
हे ही वाचा : चलो बने आदर्श : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा क्रांतिकारी उपक्रम
Table of Contents
- डोळा
चेहरा वाचण्यासाठी डोळ्यांचा संपर्क ही बाब खूप महत्त्वाची आहे. समोरच्या व्यक्तीचे डोळे आपल्या डोळ्यांना भिडत असतील तर समोरच्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरपूर आहे. समोरचा व्यक्ती जी बोलत आहे ती गोष्ट सत्य असू शकते. त्याच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा असू शकतो.
याउलट समोरचा व्यक्ती आपल्या नजरेला नजर देण्याचे टाळत असेल तर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा कमी असू शकतो, त्याचबरोबर तो आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचे दिसते, असे समजायला हरकत नाही. म्हणून त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे असे नाही. त्या पाठीमागील कारण ही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते.
हे ही वाचा : विधानसभा निवडणुक शाळांच्या सुट्टीबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय
2. डोळ्यांच्या हालचाली
मानवी डोळा हा भावना व्यक्त करण्याचे सर्वात संवेदनशील माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या हालचालीवरून आपल्याला काही महत्त्वाचे अंदाज करता येतात, त्यामध्ये समोरचा व्यक्ती उजवीकडे वर पाहत असेल तर तो कल्पना करत असू शकतो. समोरचा व्यक्ती डावीकडे वर पाहत असेल तर काही आठवण्याचा प्रयत्न करत आहे असे समजायला हरकत नाही. जर समोरचा एखादा व्यक्ती सतत हालचाल करत आहे, अस्थिर आहे तर तो अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त असू शकतो.
3. हसणे
समोरच्या व्यक्तीचे हसण्यावरून त्याच्या काही भावना कळू शकतात. हसण्या मध्येही काही फरक आहेत. कुणी स्मित हास्य करतं, कुणी मोठमोठ्याने हसते. यावरून सुद्धा व्यक्तीच्या भावना ओळखल्या जाऊ शकतात. समोरची व्यक्ती हसत असताना मुक्तपणे हसत असेल, त्या हसण्याचा प्रभाव डोळ्यापर्यंत जात असेल तर ती व्यक्ती खरोखर मनापासून हसत आहे असे समजायला हरकत नाही. जर समोरची व्यक्ती केवळ ओठापुरते मर्यादितच हसते तर ती कृत्रिम पणे किंवा ओढून ताणून हसत आहे असे समजायला हरकत नाही.
4. ओठ चावणे
समोरच व्यक्ती जर चिंता किंवा विचारात असेल तो वारंवार ओठ चावत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तो एखाद्या प्रसंगाबाबत तणावात सुद्धा असू शकतो.
5. ओठ घट्ट बंद करणे
समोरच्या व्यक्तीला काही सांगायचे आहे परंतु तो सांगू शकत नाही अशावेळी समोरची व्यक्ती मत लपवत आहे किंवा तणावात आहे हा अर्थ काढायला हरकत नाही.
6. भुवया
जर एखाद्या व्यक्ती च्या भुवया वर उचवललेल्या असतील, तर त्या व्यक्तीला आश्चर्य किंवा कुतूहल वाटले असे समजायला हरकत नाही. त्याचबरोबर त्या व्यक्तीला शंका सुद्धा आलेली असेल हाही अर्थ निघू शकतो. जर समोरच्या व्यक्तीच्या भुवया जोडल्या गेल्या तर ती व्यक्ती तणाव,चिंता किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असू शकते हा अर्थ निघू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या भुवया जर समांतर असतील तर ती व्यक्ती किंवा विचारशील मनस्थिती मध्ये आहे असे विचार करायला हरकत नाही.
7. चेहऱ्याचे हावभाव
जर समोरच्या व्यक्तीची हावभाव नैसर्गिक वाटत असेल तर ती व्यक्ती प्रामाणिक आहे असे समजायला हरकत नाही. जर समोरची व्यक्ती खूप नियंत्रित किंवा अवास्तव हावभाव करत असेल,तर त्या व्यक्तीच्या हालचालीत कृत्रिमता आहे, त्याचबरोबर ही व्यक्ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असे समजायला हरकत नाही.
8. त्वचा आणि चेहऱ्याचा रंग बदल
जर समोरच्या व्यक्तीचा चेहरा लाल होत असेल तर ती व्यक्ती एकतर चिडलेली असू शकते, किंवा ती लज्जास्पद झालेली असू शकते, किंवा मानसिक उत्तेजना अवस्थेत असू शकते. जर समोरच्या व्यक्तीचा चेहरा फिकट पडला तर त्या व्यक्तीला धक्का बसलेला असू शकतो किंवा ती व्यक्ती तणावात आहे असे समजायला हरकत नाही.
9. चेहऱ्याचे हालचाल व वर्तवणूक
प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर सूक्ष्म हावभाव सेकंदा सेकंदाला बदलत असतात. हे हावभाव व्यक्तींच्या सूक्ष्म भावना दर्शवत असतात आणि त्या भावना ख-या असू शकतात. किती जरी शांत चेहरा दिसत असला तरी त्याच्या डोक्यातील विचार ज्याप्रमाणे बदलत असतात, त्याप्रमाणे चेहऱ्यावरील भावनांमध्ये सुद्धा बदल होत असतो. याचे सूक्ष्म निरीक्षण करून आपण चेहरा वाचन हे शास्त्र आत्मसात करू शकतो.
10. शारीरिक भाषा
चेहरा वाचताना व्यक्तीच्या शरीराच्या हालचाली देखील महत्त्वाच्या आहेत. यामध्ये डोळे वळवणे, हातांचा वापर आणि बसण्याची पद्धत याही गोष्टी मानसिक अवस्थेचे संकेत देत असतात.
चेहरा वाचणे हे एक प्रकारचे कौशल्य आहे आणि हे कौशल्य सरावानेच सुधारता येऊ शकते. लोकांच्या हावभावांचे निरीक्षण करणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावनांचे विश्लेषण करणे आणि विविध परिस्थितीमध्ये त्यांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे असते.
चेहऱ्या वाचन ही पूर्णतः एक अचूक प्रक्रिया नसली तरी ती व्यक्तीच्या मानसिक आणि वागणुकीचा अंदाज घेण्यास मदत करते. योग्य निरीक्षण,अनुभव आणि संवेदनशीलता या गोष्टीचा वापर केल्यास तुम्ही या कलेत प्रवीण होऊ शकता.