डिजिटल जनगणना : केंद्र सरकार द्वारे दोन टप्प्यात करण्यात येणार याबाबत सविस्तर माहिती थोडक्यात
Table of Contents
केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केलेली आहे की 2026-27 मध्ये पहिली डिजिटल जनगणना होणार असून यामध्ये नागरिक स्वतः माहिती भरू शकतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. digital Census (डिजिटल जनगणना)
भारतीय जनगणना सर्वसाधारणपणे दहा वर्षातून एकदा होत असते. परंतु अलीकडील काही आपत्तीमुळे जनगणना ही प्रलंबित राहिलेली आहे. ही जनगणना कोविडच्या कालावधीमध्ये होणे अपेक्षित होती परंतु यामध्ये बहुतांश कर्मचारी इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे ही जनगणनांना प्रलंबित होती.
हे ही वाचा: Aashadhi ekadashi : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन
आगामी जनगणनेमध्ये सामान्य लोक स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन नोंदवू शकतील असा पर्याय केंद्र सरकार देणार असल्याचे मीडिया रिपोर्ट मधून समजते. मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा या जनगणनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
यापूर्वी ज्या जनगणना झाल्या त्या जनगणना कर्मचारी प्रत्येक घरोघरी माहिती कागदावर गोळा करण्यासाठी जात होते. परंतु आता कर्मचाऱ्यांना डिजिटल साधने देऊन ही जनगणना पूर्ण केली जाणार आहे. जनगणना प्रक्रिया ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणारा असून मोबाईल ॲप आणि ऑनलाईन पोर्टल याद्वारे ही माहिती गोळा केली जाऊन ती केंद्र सरकारच्या सर्वर ला जमा होणार आहे.
हे ही वाचा: जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम जुना आणि नवीन ! या विषयी माहिती
या जनगणनेचा पहिला टप्पा एक एप्रिल 2026 रोजी सुरू होणार असून यामध्ये फक्त घरांची मोजणी केली जाणार आहे असे समजते. 2026 आणि 2027 मध्ये दोन टप्प्यांमध्ये ही जनगणना पार पडेल. भारतीय जनगणनेचा दुसरा टप्पा एक फेब्रुवारी 2027 पासून सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यांमध्ये लोकांची लोकसंख्या जात आणि इतर आवश्यक माहिती यामध्ये गोळा केली जाणार आहे.
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ही सोळावी आणि हायटेक जनगणना असणार आहे. देशाच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हा ऐतिहासिक टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे.(डिजिटल जनगणना)
हे ही वाचा: विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीसे जिंका !
जात निहाय जनगणना असल्यामुळे ही जनगणना इतर जनगणने पेक्षा वेगळी असणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1930 साली इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. त्यानंतर प्रथमच जातनिहाय जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याचे मीडिया रिपोर्ट मधून समजते.