गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात !

गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे थोडक्यात खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.

गुरुपौर्णिमेला भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. गुरुपौर्णिमेकडे एक पवित्र व भारतीय श्रद्धेचा दिवस म्हणून पाहिले जाते. गुरूंच्या आज पर्यंत केलेल्या योगदानाला सन्मान देण्यासाठी, न्याय देण्यासाठी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.. गुरु म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा एक दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. गुरु म्हणजे अंधकार नष्ट करून प्रकाश देणारा तेजोमय दिवा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत टिकून राहिलेले आहे. (importance of Guru Purnima)

हे ही वाचा: डिजिटल जनगणना : केंद्र सरकार द्वारे दोन टप्प्यात करण्यात येणार

गुरुपौर्णिमा म्हणजे एक असा दिवस, ज्या दिवशी शिष्य आपल्या गुरु विषयी ऋण व्यक्त करतो आणि कृतज्ञता मानतो. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये येत असून तिचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी व्यासांनी महाभारत महापुराने आणि अनेक ग्रंथाची रचना केली.

त्याचबरोबर बौद्ध परंपरेत सुद्धा गुरुपौर्णिमेला खूप मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की गौतम बुद्धांनी याच दिवशी आपल्या शिष्य संघाला धर्माचा उपदेश दिलेला होता.

हे ही वाचा: Aashadhi ekadashi : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याचा एक सुंदर सण. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना फुल, फळ, वस्त्र आणि इतर गोष्टी भेट वस्तू स्वरूपात देऊन गुरूंचे आशीर्वाद घेत असतो.

या दिवशी शाळा, कॉलेज, मोठमोठे आश्रम, आध्यात्मिक सोहळ्यामध्ये मध्ये गुरुपौर्णिमेला खूप मोठा गुरूंचा सन्मान केला जातो. यावेळी प्रवचनाचे सुद्धा आयोजन करण्यात येत असते.

गुरु ही एक आपल्या आयुष्यातील शक्ती आहे, प्रेरणा आहे. गुरु आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम करतो. गुरु हे फक्त शाळा कॉलेजमध्येच असतात असे नाही. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनाला एक कलाटणी मिळाली आपले जीवन समृद्ध झाले ते आपल्यासाठी गुरु असतात. गुरुपौर्णिमेचे महत्त्व (importance of Guru Purnima)

हे ही वाचा: जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम जुना आणि नवीन ! या विषयी माहिती

आई सुद्धा मुलाची गुरू असू शकते. वडील सुद्धा मुलाचे गुरु असू शकतात. आधुनिक काळात सुद्धा गुरुचे महत्त्व अजिबात कमी झालेले नसून मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये आजही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

जोपर्यंत गुरु आहे, तो पर्यंत गुरुपौर्णिमा असेल. शिष्य आहे तोपर्यंत शिष्याला मार्गदर्शन मिळत राहणार आहे आणि गुरुपौर्णिमा ही पिढ्यानपिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अशीच हस्तांतरित राहणार आहे.

Leave a Comment