NCMC smart card: प्रवाशांसाठी सवलतच सवलत ! महिला तसेच जेष्ठ नागरिकांना व अमृत जेष्ठ नागरिकांना मिळणार लाभ या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
NCMC smart card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी व परिवहन मंडळामध्ये कामकाजाबाबत पारदर्शकता वाढावी आणि कामकाज डिजिटल पद्धतीने व्हावे या उद्देशाने 1 ऑगस्ट 2026 पासून महिला तसेच जेष्ठ नागरिकांना व अमृत जेष्ठ नागरिकांना NCMC (National common mobility card) smart card बंधनकारक करण्यात येणार आहे.
या स्मार्ट कार्ड मुळे महिलांना जेष्ठ नागरिकांना व तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सवलतींचा लाभ घेता येणार आहे, जर स्मार्ट कार्ड नसेल तर त्यांच्याकडून संपूर्ण भाडे आकारले जाईल असे माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व तसेच परिवहन मंत्री यांनी दिली आहे.
हे ही वाचा: सेतू अभ्यास: इ.3 री, 4 थी व 6 वी साठी सविस्तर माहिती व अंमलबजावणी
NCMC स्मार्ट कार्ड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे या निर्णयामागील उद्दिष्टे:
- महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये व कामकाजामध्ये पारदर्शकता वाढावी.
- डिजिटल व्यवहारांना चालना देणे.
NCMC smart card वितरण केंद्र जवळपास राज्यभर 4000 पेक्षा जास्त सुरू करण्यात आली आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊन नये यासाठी वितरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत. राज्यभर या निर्णयाच्या अंमलबजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली जात आहे. नियंत्रण केंद्र, एसटी बस डेपो व तसेच अधिकृत एजंट यांच्या माध्यमातून देखील नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे कार्ड ग्रामीण व शहरी भागांमध्ये सहज पणे उपलब्ध व्हावे यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
NCMC smart card माध्यमातून सवलतीचे तिकीट थेट वॉलेट कार्ड मधून दिले जाणार असून या वॉलेटमध्ये रोख रक्कम आणि UPI द्वारे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
हे ही वाचा:SQAAF app मध्ये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा स्वयं मूल्यांकन
स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी आपणास नोंदणी करणे आवश्यक असेल त्यानंतर तुम्हाला ते कार्ड 30 दिवसानंतर वितरित केले जातील. जर तुम्हाला नवीन स्मार्ट कार्ड काढायचे असेल तर 199 रुपये शुल्क आकारले जातील असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. महिला प्रवाशांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी वैध ओळखपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
स्मार्ट कार्ड मुळे वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसून निर्धारित शुल्क पेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल व तसेच परवाने रद्द केले जातील. असे परिवहन मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.






