शैक्षणिक वर्ष 2026-27: नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमाबाबत तपशील !

शैक्षणिक वर्ष 2026-27: शैक्षणिक वर्ष 2026-27: नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमाबाबत तपशील ! या विषयी सविस्तर माहिती.

Table of Contents

नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीला शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आणि शासनाच्या विविध गतिमान उपक्रमांची नाशिक मनपा शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणे या उद्देशाने या शाळापूर्व तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

1. गुणवत्ता वाढ आणि स्पर्धा परीक्षांचे नेटके नियोजन

स्पेलिंग बी (Spelling Bee) स्पर्धा

विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेचा पाया प्राथमिक स्तरापासूनच मजबूत करण्यासाठी मनपा स्तर स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घ्यायचे असून दि.25 जून पासून स्पेलिंग वी उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी (मंथन, NMMS इ.)

शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता 2 री व 3 री, 5 वी व 6 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘मंथन’ परीक्षा, तर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) अत्यंत महत्त्वाची आहे. या परीक्षांच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी वर्षारंभापासूनच नियोजित तासिका घेऊन पूर्ण करावी, जेणेकरून मनपा शाळांचे जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील.

शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exams)

इयत्ता 4 थी आणि 7 वी आणि पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षांसाठी पात्र इयता 3 री व 6 वीच्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच यासाठी शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जाणार आहे.

विनोबा टीम मार्फत १ जुलै पासून दर पंधरा दिवसांनी सराव पेपर विनोबा app वर देण्यात येईल तो विद्यार्थ्याकडून सोडवून घेवून त्याचे गुण विनोबा app मध्ये भरण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळेतील शिक्षकांनी अद्याप विनोबा app वर रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्यानीं तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्यावेत.

हे ही वाचा: My bharat पोर्टलवर आयोजित केला जाणाऱ्या विविध स्पर्धा/उपक्रमांचे प्रचार

2. पटनोंदणी, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक अभियाने

पट नोंदणी आणि विद्यार्थी उपस्थिती

नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरुवातीलाच 100% पटनोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहीम (उदा. प्रवेश वाढवा अभियान) राबवली जाईल.

दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेतील दैनंदिन उपस्थिती किमान 90% राहील, याकडे शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष द्यावे. स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या कार्यालयाने दिलेले पट संख्या वाढीचे उद्दिष्टये जून अखेर पूर्ण करण्यात येतील.

‘निपुण महाराष्ट्र’ अभियान

पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) अंतर्गत ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाची प्रत्येक प्राथमिक शाळेत काटेकोर अंमलबजावणी होईल. इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गतीने वाचन, लेखन आणि मूलभूत गणिताच्या क्रिया आणि त्या-त्या वर्गाच्या किमान क्षमता प्राप्त झालेल्या असल्या पाहिजेत, यावर शिक्षकांनी विशेष भर द्या असे शासन कडून सांगण्यात आले आहे.

तसेच पुढील कालावधीत शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता निहाय चाचणी घेवून मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमित उपचारात्मक वर्ग घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांच्यावर निश्चित करण्यात येत आहे. यांची सर्वांनी नोंद घ्यावी.

भविष्यवेधी शिक्षण व उपचारात्मक शिक्षण

मागील कालावधीत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्यवेधी शिक्षण प्रकिया सर्व शिक्षकांनी समजून घेतली आहे. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहांचा स्वीकार करून शिक्षकांनी ‘भविष्यवेधी शिक्षण’ पद्धतीचा वापर प्रत्येक शाळेत झाला पाहिजे. वर्गातील जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, त्यांचे मूल्यांकन करून त्यांच्यासाठी विशेष ‘उपचारात्मक शिक्षण’ (Remedial Teaching) सत्र आयोजित करण्यात येणार आहे. याची सर्व जबाबदारी वर्गशिक्षक यांना देण्यात आली आहे.

शैक्षणिक पेटीचा वापर (भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी) (Kits) प्रभावी वापर

शैक्षणिक वर्ष 2026-27 शासनाकडून शाळांना पुरवण्यात आलेल्या भाषा, गणित. इंग्रजी आणि विज्ञान पेटीचा वापर केवळ कपाटात न ठेवता, दैनंदिन अध्यापनात प्रात्यक्षिकांसाठी करावा. यामुळे विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सहज समजतील. यापुढे शाळाभेटी दरम्यान शैक्षणिक साहित्य वर्गाऐवजी, भांडार, अडगळीत किंवा इतर खोलीत आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

विषय मित्र व गट शिक्षण पद्धत

वर्गात हुशार विद्यार्थ्यांची ‘विषय मित्र’ म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून इतर सहकाऱ्यांना अभ्यासात मदत करण्याची पद्धत रूजवावी. गट शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमधील परस्पर सहकार्य आणि आत्मविश्वास वाढेल. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे लहान वर्गातील विद्यार्थ्यांसोबत गट-वर्ग रिकामा असतांना त्यांनी अभ्यास घेणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा: Swiftchat: राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे हजेरी ऑनलाईन घेण्याचा आदेश

3. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व नाविन्यपूर्ण उपक्रम

शैक्षणिक सहलींचे आयोजन

केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी इस्रो (ISRO). आयसर (IISER), विविध बँका आणि नाशिक मनपाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना शैक्षणिक सहलींचे नियोजन करावे. या सहलींचा अहवाल विद्यार्थ्यांनी तयार करावा.

परदेशी भाषा व कौशल्य विकास

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना जर्मन आणि आपली प्राचीन समृद्ध भाषा संस्कृत शिकवण्यासाठी विशेष उपक्रमराबवावेत. या अनुषंगाने प्रत्येक शाळेने किमान एक परदेशी भाषा शाळेत शिकविण्यास सुरवात करावी. याचा आढावा घेण्यात येईल.

माझी वाचन डायरी

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ‘माझी वाचन डायरी हा उपक्रम घेण्यात यावा. विद्यार्थ्यांनी वर्षभरात वाचलेल्या अवांतर पुस्तकांचा थोडक्यात गोषवारा या डायरीत लिहिणे बंधनकारक राहील आणि शिक्षक त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करतील.

हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३री ते ८वी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित !

4.विद्यार्थी सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणः

विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने कामकाज

शालेय परिसरात विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. शाळेत येणारे अभ्यांगत, सीसीटीव्ही (CCTV) ची कार्यक्षमता आणि आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी मुख्याध्यापकांनी चोख व्यवस्था ठेवायला हवे.

पोलीस काका व पोलीस दीदी उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना गुड टच-बँड टच, सायबर सुरक्षा व कायद्याची प्राथमिकं माहिती देण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या समन्वयाने पोलीस काका व पोलीस दीदी उपक्रम प्रत्येक शाळेत नियमित राबवण्यात येणार आहे.

परिवहन समिती व पोलीस आयुक्त कार्यालय वेबसाईट नोंदणी

प्रत्येक शाळेने तात्काळ ‘शालेय परिवहन समिती’ (School Transport Committee) स्थापन करावी. या समितीची संपूर्ण माहिती नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत https://www.schoolbussafetynashik.org या वेबसाईटवर नोंदवणे अनिवार्य आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित राहील.

हे ही वाचा: “एक पेड मां के नाम” मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम

5.पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्यः

स्वच्छतागृह व कामाठी कामकाज

शालेय स्वच्छतागृहे दररोज स्वच्छ आणि निर्जंतुक राखली पाहिजेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या (कामाठी) कामकाजाचे मुख्याध्यापकांनी स्वतः रोज पर्यवेक्षण करावे. पाण्याचा पुरवठा आणि योग्य साफसफाई न झाल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता

पावसाळा व नवीन वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक (Chlorination) करून घ्याव्यात आणि तसा नोंदीचा फलक लावण्यात येणार आहे.

पिंक रूम (Pink Room) तयार करणे

किशोरवयीन विद्यार्थिनीच्या आरोग्याच्या आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेच्या दृष्टीने शाळांमध्ये सर्व सोयींनी युक्त ‘पिंक रूम (सॅनिटरी नॅपकिन मशीन व विल्हेवाट यंत्रणेसह) तयार करण्यात येतील.

Leave a Comment