PM-YASASVI Pre Matric Scholarship for OBC, EBC and DNT Students योजनेसाठी NSP Portal वर संस्था नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज भरणेबाबत सविस्तर माहिती.
Table of Contents
दिनांक 24/06/2026 इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या OBC, EBC व DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी PM-YASASVI Pre Matric Scholarship for OBC, EBC and DNT Students ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज केवळ National Scholarship Portal (NSP) वर स्वीकारण्यात येणार आहेत.
त्यानुषंगाने ज्या माध्यमिक शाळांनी NSP Portal वर अद्याप संस्था नोंदणी (Institute Registration) केलेली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करावी. तसेच ज्या शाळांची यापूर्वी नोंदणी झालेली आहे त्यांनी पुननोंदणी करण्याची आवश्यकता नसून संस्थेचे Profile अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल.
हे हो वाचा: Swiftchat: राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे हजेरी ऑनलाईन घेण्याचा आदेश
NSP Portal वर संस्था नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक
- संस्थेचे पूर्ण नाव
- AISHE Code / UDISE Code / Institute Code
- राज्य व जिल्हा
- संस्थेचा संपूर्ण पत्ता
- मुख्याध्यापक / संस्थाप्रमुख यांची माहिती
- अधिकृत ई-मेल आयडी
- अधिकृत मोबाईल क्रमांक
नोंदणी करताना संस्थेसाठी Nodal Officer नियुक्त करणे आवश्यक असेल, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त User ID व Password च्या सहाय्याने संस्था Profile अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करणे आवश्यक असेल.
तसेच मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना NSP Portal वर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करावे व आवश्यक कागदपत्रे (आधार क्रमांक, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र इ.) उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात येतील.
NSP Portal वर संस्था नोंदणीची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2026 असून, विहित मुदतीत नोंदणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची पडताळणी करता येणार नाही. त्यामुळे सदर कामकाजास प्राधान्य देऊन तात्काळ कार्यवाही करावी. सदर शिष्यवृत्ती लाभा पासुन विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांची राहिल.
NSP Portal संकेतस्थळ : https://scholarships.gov.in
हे हो वाचा: My bharat पोर्टलवर आयोजित केला जाणाऱ्या विविध स्पर्धा/उपक्रमांचे प्रचार
“PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC, AND DNT STUDENTS (इयत्ता 9 वी ते 10 वी)” या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज केवळ NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वरून स्वीकारण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सदर बाबीची अंमलबजावणी होण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश प्राप्त झालेले आहेत.
- इयत्ता 9 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना “PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC, AND DNT STUDENTS ही आहे.
- ज्या माध्यमिक शाळांनी NSP PORTAL वर नोंदणी केलेली नाही अशा माध्यमिक शाळांनी NSP PORTAL वर संस्था नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करणे आवश्यक आहे.
- ज्या माध्यमिक शाळांनी यापूर्वीच NSP PORTAL वर नोंदणी केलेली आहे अशा शाळांना पुननोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी केवळ आपल्या संस्थेची प्रोफाईल अद्यावत करुन अर्ज पडताळणीची प्रक्रिया करावी.
- त्याअनुषंगाने सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना NSP PORTAL वर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन व आवश्यक सूचना देणे अपेक्षित आहे.
- विद्यार्थ्यांना अर्ज करतांना आवश्यक कागदपत्रे, आधार क्रमांक, वैध बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी बाबींची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
माध्यमिक शाळांसाठी NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) वर संस्था नोंदणी (INSTITUTE REGISTRATION) करण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे.
- प्रथमतः HTTPS://SCHOLARSHIP.GOV.IN या संकेतस्थळास भेट द्यावी.
- मुख्य पृष्ठावरील INSTITUTE REGISTRATION हा पयार्य निवडावा.
- नोंदणी प्रक्रियेदरम्यान खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे.
a. संस्थेचे पूर्ण नाव
b. AISHE CODE/UDISE CODE/INSTITUTE CODE
c. राज्य व जिल्हा
d. संस्थेचा संपूर्ण पत्ता
e. संस्थेच्या प्रमुखांची माहिती (PRINCIPAL/HEAD OF INSTITUTION)
f. अधिकृत ई-मेल आयडी
g. अधिकृत मोबाईल क्रमांक
- नोंदणी करतांना संस्थेसाठी NODAL OFFICER नियुक्त करणे आवश्यक आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित संस्थेला पोर्टलमार्फत USER ID व PASSWORD उपलब्ध होतील.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयाचे डिस्ट्रिक नोडल ऑफिसर यांचेकडुन APPROVAL मिळाल्यानंतर संस्थेच्या INSTITUTE PROFILE अद्यावत करुन विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करणे आवश्यक राहील.
हे हो वाचा: शैक्षणिक वर्ष 2026-27: नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमाबाबत तपशील !
NSP PORTAL वर माध्यमिक शाळा/संस्था नोंदणीची अंतीम मुदत दि.31 जुलै, 2026 पर्यंत करणे बंधनकारक राहील. निर्धारीत कालावधीत नोंदणी पूर्ण न झाल्यास संस्थाना/शाळांना विद्यार्थ्यांचे NSP PORTAL वर शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी करणे शक्य होणार नाही. सदर अंतिम मुदतीनंतर कोणत्याही नोंदणी प्रक्रियेचा विचार करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.
त्याअनुषंगाने नाशिक जिल्हयातील आपले अधिनस्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांना NSP PORTAL वर ज्या शाळांची नोंदणी बाकी आहे अशा शाळांना NSP PORTAL वर नोंदणी करणेबाबत व ज्या शाळांची नोंदणी यापूर्वीच झालेली आहे अशा शाळांनी पुननोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी केवळ आपला संस्थेचा प्रोफाईल अद्यावत करणे आवश्यक आहे याबाबत आपले कार्यालयामार्फत आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. जेणेकरुन “PM-YASASVI PRE MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC, AND DNT STUDENTS या योजनेअंतर्गत (इयत्ता ९ वी ते १० वी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज NATIONAL SCHOLARSHIP PORTAL (NSP) पोर्टलवर भरणे सुलभ होईल.
NSP PORTAL वर नोंदणी करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांचा अहवाल दर आठवडयाला सादर करणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती दर आठवडयाला या कार्यालयास सादर करण्यात यावी जेणेकरुन सदर माहिती मा. संचालनालयास सादर करणे सुलभ होईल






