नवीन अभ्यासक्रम : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन कार्यपद्धती या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ पासून इ.१ली आणि सन २०२६-२७ पासून इ.२री, ३री, ४थी व इ.६वी इयत्तांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे. राज्यातील इ.१ ली ते ८वी शाळांसाठी विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळेचे नियोजन विहित करुन देण्यात आलेले आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार विषय निहाय पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत पुरविण्यात आलेली आहेत. इ.१ली, २री कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांसाठी “खेळू करु शिकू” शिक्षक हस्तपुस्तिका SCERT मार्फत पुरविण्यात आलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार काही विषय नव्याने सुरु झालले आहेत तसेच काही विषयांच्या नावांमध्ये बदल झालेला आहे.
नवीन अभ्यासक्रम सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून इ. १ली ते ८वी साठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन (CCE) कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा: विद्यार्थी सुरक्षा ते बाबत महत्त्वाची सविस्तर माहिती
नवीन अभ्यासक्रमानुसार बदललेल्या विषयरचनेच्या अनुषंगाने सन. २०२६-२७ साठी इ.१ली ते ८वी मूल्यमापनाबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
१. नवीन अभ्यासक्रम नुसार, नावांमध्ये बदल न झालेल्या तसेच जुना अभ्यासक्रम लागू असलेल्या शालेय विषयांसाठी विहित करण्यात आलेली मूल्यमापन पद्धती लागू राहील.
२. नवीन अभ्यासक्रम नुसार काही विषयांच्या नावात बदल झालेला असला तरी, बदललेल्या नावांसह पूर्वीच्या विषयांस लागू असलेली (आकारिक व संकलित) मूल्यमापन पद्धती विहित केल्याप्रमाणे लागू राहील. जसे- परिसर अभ्यास-१ व २ या पूर्वाश्रमीच्या विषयांप्रमाणे, आपल्या सभोवतालचे जग-१ व २ या विषयांसाठी इ.३री, ४थी साठी- आकारिक ६०% व संकलित ४०% आणि इ.५वी साठी- आकारिक ५०% व संकलित ५०% मूल्यमापन पद्धती लागू राहील.
३. इतर माध्यमातील अनिवार्य मराठी विषयाची मूल्यमापन प्रक्रिया प्रचलित पद्धतीप्रमाणे सुरु राहील.
४. इ.५वी व इ.८वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केल्याप्रमाणे लागू राहील.
५. कार्यानुभव हा विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाणार असून तो इ.५वी पर्यंत असणार आहे. त्यामुळे कार्यानुभव विषयासाठी विहित केलेली (आकारिक १००%) मूल्यमापन पद्धती कार्यशिक्षण विषयासाठी लागू राहील.
६. इ.६वी पासून व्यावसायिक शिक्षण हा विषय नव्याने सुरु करण्यात आला आहे. सदर विषयासाठी कार्यानुभव विषयांसाठी विहित केलेली (आकारिक १००%) मूल्यमापन पद्धती व्यावसायिक शिक्षण विषयासाठीही लागू राहील.
७. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रक्रियेमधील समग्र प्रगती पत्रक (HPC) हा एक भाग असून सद्यस्थितीत पथदर्शी स्वरूपात त्याची अंमलबजावणी राज्यातील काही शाळांमध्ये सुरू आहे. त्या शाळांनीही मूल्यमापन विषयक कार्यवाही करावी. समग्र प्रगती पत्रक (HPC) च्या सार्वत्रिक अंमलबजावणीबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील.
८. सदर परिपत्रकातील सूचना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी देण्यात येत आहेत
हे ही वाचा:एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड़ परीक्षा २०२६ विषयी सविस्तर माहिती.
कलाशिक्षण मूल्यमापन (२०२६-२७)
कला शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत दृश्यकला आणि प्रायोगिक कला यांच्या एकात्मिक दृष्टिकोनानुसार चार प्रमुख कलागटांचा (दृश्यकला, रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) समावेश आहे.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यामुळे, कला शिक्षण विषयाच्या आकारिक मूल्यमापनासाठी CCE संदर्भातील २०१० च्या शासन निर्णयातील आठ साधन-तंत्रापैकी किमान पाच साधन तंत्रे वापरण्यात यावी.
कलाशिक्षण विषयाचे मूल्यांकन करताना प्रात्यक्षिकातंर्गत कलेचे ‘सादरीकरण’ या साधन तंत्राचा वापर करण्यात यावा. तसेच ‘लेखी चाचणी’ या साधनाचा वापर करण्यात यावा.
कलाशिक्षण या विषयाचे मूल्यमापन करताना सादरीकरण व लेखी चाचणी या साधनाचा वापर करणे अनिवार्य आहे.
सादरीकरण (Presentation) – प्रत्यक्ष कलाविष्कार, अभिव्यक्ती, सादरीकरण कौशल्य, सर्जनशीलता, साधनांचा प्रभावी वापर आणि आत्मविश्वास.
स्पष्टीकरण व मूल्यमापनाचे स्वरूप :
कला शिक्षणात विद्यार्थी केवळ कागदावर चित्र काढण्यापुरता मर्यादित नसून तो विविध कलाकृतींचे व कलागुणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन किंवा सादरीकरण करतो. विद्यार्थ्यांनी दृश्यकला आणि सादरीकरण कला (रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) या कला गटांतर्गत केलेल्या प्रात्यक्षिक कृतींचे आणि कलाविष्काराचे प्रत्यक्ष सादरीकरण. यात विद्यार्थ्यांची कल्पकता, कलाकृती सादर करण्याची पद्धत, साहित्याची योग्य निवड, सादरीकरणातील लय-ताल, आत्मविश्वास, आणि सादरीकरणानंतरच्या चर्चेत सहभाग या निकषांच्या आधारे कौशल्याधारित गुणांकन व श्रेणीदान करणे.
लेखी चाचणी कलेचा सैद्धांतिक व वैचारिक आशय, रंग व साधन साहित्याची ओळख, लोककलांची माहिती, उपयोजन आणि रसग्रहण.
हे ही वाचा:PM-YASASVI Pre Matric Scholarship: NSP Portal वर संस्था नोंदणी व विद्यार्थी अर्ज प्रक्रियेबाबत सूचना
स्पष्टीकरण व मूल्यमापन स्वरूप :
कला शिक्षण विषयाची ‘लेखी चाचणी’ ही विद्यार्थ्यांची कलाविषयक सैद्धांतिक समज, निरीक्षण शक्ती, सौंदर्यदृष्टी आणि बौद्धिक पातळी तपासण्यासाठी घेतली जाणारी चाचणी आहे. यामध्ये चारही कलागटांच्या (दृश्यकला, रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) सैद्धांतिक व वैचारिक आशयाचा अंतर्भाव असावा. विद्यार्थ्यांची कलाविषयक संकल्पनांची समज व लोककलांची माहिती, रंगांची व साधन साहित्याची ओळख इत्यादी मुद्द्यांवर आधारित लेखी चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या कलाविषयक सैद्धांतिक ज्ञानाचे व आकलन क्षमतेचे लिखित स्वरूपात मूल्यमापन करावे.
इयत्ता ६ वी व्यवसायिक शिक्षण : शिक्षकांसाठी मूल्यमापन अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना
१. प्रस्तावना, उद्देश व मूल्यमापनाची प्रमुख तत्त्वे
व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यमापन विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रत्यक्ष कौशल्ये, सुरक्षितता, सहकार्य, जबाबदारी, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, कामाशी संबंधित मूल्ये आणि श्रमप्रतिष्ठेची जाणीव यांचा सर्वांगीण आढावा घेणारे असावे. केवळ अंतिम उत्पादन नव्हे, तर कामाची प्रक्रिया, प्रयत्न, निर्णय, निरीक्षणे आणि सुधारणा यांचेही मूल्यमापन करावे.
प्रत्येक मूल्यमापन कृती अभ्यासक्रमातील अपेक्षित क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि अभ्यासक्रम ध्येयांशी जोडलेली असावी.
लेखी चाचणीबरोबर उपक्रम पुस्तिका, प्रकल्प, प्रात्यक्षिक, क्षेत्रभेट, मौखिक प्रश्नोत्तरे, सादरीकरण, आणि संचिका यांचा संतुलित वापर करावा.
विद्यार्थ्याने काम कसे केले, कोणती साधने निवडली, सुरक्षिततेचे नियम पाळले का, अडचणी कशा सोडवल्या आणि अनुभवातून काय शिकले याची नोंद घ्यावी.
गुणांकनाचे निकष/रुब्रिक विद्यार्थ्यांना आधी सांगावेत आणि सर्वांसाठी समान रीतीने वापरावेत.
विद्यार्थ्यांची भाषिक, सामाजिक, आर्थिक, दिव्यांगत्वाशी संबंधित आणि साधनसामग्रीतील भिन्नता लक्षात घेऊन समावेशक संधी द्याव्यात; मात्र अपेक्षित
कौशल्याचे निकष स्पष्ट ठेवावेत.
हे ही वाचा:मनपा प्राथमिक शाळांना 2026-27 या शैक्षणिक वर्षात दयावयाच्या सुट्यांच्या यादीचे तपशील
२. मूल्यमापनाची रचना व गुणभारांश
राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार मूल्यमापन करताना प्रात्यक्षिक साठी ७५% व लेखी साठी २५% असा भारांश विचारात घ्यावा, आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासंबंधी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०१० चे अवलोकन करावे.

वर्षभरात ‘सजीव आधारित’, ‘यंत्र व साहित्य आधारित’ आणि ‘मानवी सेवा आधारित’ या प्रत्येक कार्यक्षेत्रातून एक, असे एकूण तीन प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य आहे. कोणत्याही सत्रात १ क्षेत्रावर प्रकल्प केल्यास ३० गुण द्यावे व एका सत्रात दोन प्रकल्प केले असल्यास, प्रत्येक प्रकल्पास ३० गुण देऊन सरासरी काढून गुण द्यावे.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पूर्ण झालेल्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प निवडावेत; त्यातील सामायिक कौशल्यांवर आधारित प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात. आवश्यकतेनुसार सोडत पद्धत वापरता येईल.दुसऱ्या सत्राच्या अखेरीस दोन्ही सत्रांच्या गुणांची सरासरी १०० पैकी नोंदवावी.





४.८ जीवन कौशल्यांचे निरीक्षण
मूल्यमापनासाठी निवडलेल्या तंत्रामध्ये (बहुपर्यायी प्रश्नावली / मुलाखत / चाचणी/ भूमिकाभिनय/ नाट्यीकरण/ इतर) जीवन कौशल्यावर आधारित गुणदान करताना खालील जीवन कौशल्यांच्या अंतर्भाव तपासून त्या प्रमाणात गुणदान करण्यात येतील:
संवाद कौशल्य, संघकार्य, नेतृत्वगुण, समस्या सोडवण्याची क्षमता, भावनिक बुद्धिमत्ता, वेळेचे व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, आत्मविश्वास व सादरीकरण कौशल्य.
यासाठी स्वतंत्र गुण निश्चित केलेले नाहीत; संबंधित साधनाच्या मूल्यमापनामध्येच त्यांचा विचार करण्यात येईल .
५. अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्तेनुसार तिन्ही कार्यक्षेत्रांतील प्रकल्प, अपेक्षित क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि मूल्यमापनाचे वार्षिक नियोजन तयार करावे.
प्रत्येक प्रकल्पाची उद्दिष्टेट, साहित्य, प्रक्रिया, सुरक्षितता, निरीक्षणे, निष्कर्ष, सादरीकरण व विद्यार्थ्याचे स्वयंमूल्यमापन यांची नोंद करून घ्यावी.
सजीव आधारित कार्य, यंत्र व साहित्य आधारित कार्य आणि सेवा आधारित कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवाधारित संधी द्याव्यात.
वर्षअखेर एकूण तीन प्रकल्प प्रत्येक कार्यक्षेत्रातून एक पूर्ण करण्याची अपेक्षा नियोजनात समाविष्ट करावी.
प्रकल्प व उपक्रम पुस्तिकेचे निरीक्षण आणि मूल्यमापन सत्र अखेर न करता कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर करावे; विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये सुधारणा करण्यासाठी अभिप्राय घेतला जाईल.
प्रत्येक मूल्यमापनानंतर गुण, पुरावे, अभिप्राय व अध्ययनामध्ये पुढील सुधारणा यांची संक्षिप्त नोंद ठेवावी. सत्रअखेर विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापकांना विद्यार्थ्याच्या कौशल्यविकासाचा आढावा घेण्यात येईल.
व्यवसायिक शिक्षण या विषयात समाविष्ट सजीव आधारित, यंत्र व साहित्य आणि सेवा आधारित क्षेत्र या घटकांवर व संबंधित कार्यासंबंधी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व मुल्ये व जीवन कौशल्ये यावर आधारित लेखी चाचणी केली जाईल.
इयत्ता ३ री व ४ थीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन निर्णय २०१० नुसार कार्यानुभव या विषयासाठी देण्यात आलेल्या सूचनेनुसार कार्यशिक्षण या विषयाचे आकारिक मूल्यमापन करण्यात येईल.






