मोबाईल वर निर्बंध आता नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये ! कालच मनपा शिक्षण विभागाने निर्बंध बाबत चे परिपत्रक नुकतेच काढले आहे.काही अटी सुद्धा आहेत त्या आपण पाहूया.
Table of Contents
राज्यातील जिल्हा परिषद/नगरपालिका, नगर परिषदा/महानगरपालिका/अनुदानित विनाअनुदानित खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा/उच्च प्राथमिक शाळा/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात / वर्गामध्ये मोबाईल (भ्रमणध्वनी) फोन वापराबाबतचे निर्बंध शासन परिपत्रक व शासन निर्णयान्वये घालण्यात आलेले होते. Ban on mobile phones now in Nashik municipal schools! circular issued.
हे ही वाचा : “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” समारंभ उद्या 9 सप्टेंबर ला महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे संपन्न होणार.
संदर्भ क्र. 4 च्या परिपत्रकान्वये नाशिक महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांचे व्यतिरिक्त सर्व शिक्षक यांचे शालेय वेळेत मोबाईल बंद राहतील असे आदेश शिक्षण विभागाने काढलेले आहेत . सर्व शिक्षकांनी शालेय कामकाजाच्या वेळेत आपले भ्रमणध्वनी बंद करुन मुख्याध्यापकांकडे शाळा भरणेपूर्वी जमा करण्यात यावेत असे परिपत्रकात नमूद आहे. अत्यावश्यक बाबींसाठी मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.Ban on mobile phones now in Nashik municipal schools! circular issued.
परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद/नगरपालिका/ नगर परिषदा /महानगरपालिका/ अनुदानित/विनाअनुदानित खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा/उच्च प्राथमिक शाळा / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, मुख्याध्यापक, शिक्षक, यांना मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनी) वापर करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे.
हे ही वाचा : “दप्तर मुक्त शनिवार” उपक्रमांतर्गत सातपुर च्या मनपा चे विद्यार्थी रमले शेत- मळ्यामध्ये !
- मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवारात, वर्गात शैक्षणिक साधन म्हणून करता येईल. शिक्षकांना शैक्षणिक साधन म्हणून मोबाईल (भ्रमणध्वनी) वापर करताना त्याबाबत मुख्याध्यापकांची पूर्व परवानगी घेण्यात यावी.
- मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवरात, वर्गात बाहेरील व्यक्तिशी संभाषणासाठी करता येणार नाही.
- उपरोक्त 2 येथील नमूद अटींचे उल्लंघन झाल्याचे निर्देशनास आल्यास शासन निर्णय दि. 18/02/2009 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- शिक्षकेत्तर कर्मचारी/विद्यार्थी यांना शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्याबाबत शासन निर्णय. दि. 18/02/2009 अन्वये घालण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहे. (सोबत शासन निर्णय सहपत्रित करणेत येत असून, केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक यांनी त्याचे अवलोकन करुन शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या निर्देशास आणून दयावे.) असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
मोबाईल फोनच्या आवाजाने शैक्षणिक कार्यात व्यत्यय येतो आणि त्यामुळे शिक्षणासाठीचा महत्वाचा वेळ वाया जावून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो म्हणून शाळेच्या आवारात / वर्गामध्ये मोबाईल फोनच्या (भ्रमणध्वनी) वापरावर निर्बंध घालण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे असे मनपा शिक्षण विभागाच्या परीपत्रकात म्हंटले आहे.
हे ही वाचा : “आमच्या पप्पांनी गणपती आणलाय”.फेमस छोटा स्टार चिमुकला कोण आहे ?