“दप्तर मुक्त शनिवार” उपक्रमांतर्गत सातपुरच्या मनपा शाळेचे विद्यार्थी रमले शेत- मळ्यामध्ये !

शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक ३३ च्या विद्यार्थ्यांची शालेय परिसरा जवळील शेत-मळ्यात फेरी काढण्यात आली.

शाळेच्या मुख्याध्यापिका अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला. त्या दिवशी विद्यार्थ्यांना  मळ्यात गेल्यावर विविध रोपांची लागवड कशी केली जाते तसेच फळभाज्या यांची लागवड कशी केली जाते या विषयी माहिती दिली गेली .

हेही वाचा: “आमच्या पप्पांनी गणपती आणला”.फेमस छोटा स्टार चिमुकला कोण आहे ?

शेतीच्या कामांची माहिती मिळवली. शेताचे मालक श्री.भंदूरे व सौ.भंदुरे यांनी याविषयी माहिती दिली. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वनस्पतीची रचना व कार्य याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी विविध झाडांची पाने, फुले यांचे नमुने गोळा करून निरीक्षण केले.वर्गशिक्षिका कांचन पवार यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले.

 उपशिक्षक श्री सोनवणे यांनी शेतीच्या विविध कामांची माहिती दिली. उपशिक्षक सोनार यांनी विद्यार्थ्यांना विविध फळभाज्या तसेच पेरू बागा ,सोयाबीन ,गिलके यांची लागवड याबाबत विद्यार्थ्यांचे चर्चेद्वारा शंका निरसन केले .सौ भंदुरे ताई यांनी सुंदर असे भजन गाऊन दाखवले. कांदा,मुळा भाजी अवघी विठाई माझी असे त्या अभंगाचे नाव होते.असे उत्साहपूर्ण वातावरणात शिवार फेरी पूर्ण झाली.

हेही वाचा: 30 मिनिटात 1 हेक्टर जमीन मोजणी आता शक्य !

दप्तर मुक्त शनिवार
दप्तर मुक्त शनिवार

हेही वाचा: गिरलिंग मंदिर, जुना पन्हाळा कुकटोळी. महाराष्ट्राला या ठिकाणाबद्दल माहिती आहे का ? Girling Temple, Old Panhala Kuktoli. Does Maharashtra know about this place?

श्री भंदुरे यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून दरवर्षी वारीला जाणे तसेच दिंडीची आयोजन करणे यामध्ये उत्साहाने सहभागी होतात.एकत्र कुटुंब कसे असते व एकत्र कुटुंबाचे फायदे कोणते ? याविषयी मितकर पुष्पावती व मुख्याध्यापिका अहिरे यांनी मुलांना याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शिवार फेरीचा आनंद दिसत होता . फुलझाडे आणि फळबागा बघून सर्वांना आनंद झाला होता. विविध कडधान्ये व तृणधान्य यापासून बनवलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी डब्यात आणले होते. शिवार फेरी नंतर सर्वांनी जेवण्याचा आनंद घेतला. यावेळी उपशिक्षक सोनार, सोनवणे, मुख्याध्यापिका अहिरे,उपशिक्षिका मेतकर ,मंगल शेलार, सौ कांचन पवार, उज्वला आहेर यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा: मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल. How you can earn money from open space

आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘दप्तर मुक्त शनिवार ‘ हा नावीन्यपूर्ण उपक्रम नाशिक महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील शाळेत राबवण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तराची ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास  होऊ नये; तसेच विद्यार्थ्यांना खेळामध्ये रुची वाढावी यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे अभ्यासाच्या तणावात असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वागत केले आहे.

 शिकण्यासाठी ताण विरहित चांगले वातावरण हवे यासाठी “दप्तर मुक्त शनिवार” साजरा  करण्याचे ठरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे एक दिवस का होईना कमी होणार आहे.

या उपक्रमात कला, क्रीडा ,संगीत, कार्यानुभव या विषयात प्राधान्य देण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत ,शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधनसामग्री मधून विषयातील ज्ञान अवगत करता येते .प्रत्येक शनिवारी ‘दप्तर मुक्त शाळा’ उपक्रम राबवण्यात येत आहे.

Leave a Comment