ध्रुवनगर मनपा शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात साजरा या विषयी सविस्तर माहिती.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची शाळा मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन रविंद्र जी धिवरे यांच्या हस्ते पार पडले.
स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या उपक्रमासह, कार्यक्रमासह पार पडला. मनपा शिक्षण विभागाची शाळा मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन पार पडला. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिनकर आण्णा पाटील, अमोल भाऊ पाटील, रवींद्र धिवरे आणि इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दिनकर आण्णा पाटील यांनी भारतभूमीच्या प्रतिमेचे पूजन केले आणि रवींद्र धिवरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले.
हे ही वाचा: मराठा आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावली नुसार महाराष्ट्रात सर्वेक्षण उद्यापासून
महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर ही शाळा प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यावर्षी सुद्धा महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर या शाळेने भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक ज्येष्ठ माजी सभागृह नेते दिनकर आण्णा पाटील यांनी केले. “हे देश मेरे” इयत्ता पाचवीने सादर केलेल्या समुह नृत्याला दिनकर आण्णा पाटील यांनी अकराशे एक रुपये देऊन त्यांचे कौतुक केले.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन समूह नृत्ये या सांस्कृतिक कार्यक्रमात बसवलेली होती.प्रत्येक वर्गाची तयारी त्या त्या वर्ग शिक्षकांनी कोरिओग्राफरच्या मार्गदर्शनाखाली करून घेतलेली होती.
हे ही वाचा: अग्निवीरवायू भरती सुरु : लगेच अर्ज करा.
एकापेक्षा एक सुंदर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्ये सर्वांसमोर सादर केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याने पालक वर्गांची उपस्थिती उल्लेखनीय असते.
दिनकर आण्णा पाटील यांनी पालक आणि शिक्षकांचे सुद्धा यावेळी कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी दिनकर आण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे ही वाचा: FASTtag जाणार काळाच्या पडद्याआड | नवीन GPS प्रणाली कोणती ? कशी?
पुढील कार्यक्रमाचे नियोजन असल्याने त्यांनी लवकरच कार्यक्रमातून निरोप घेतला. सकाळी जवळ जवळ अकरा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम महानगरपालिका शाळा क्रमांक 22 येथे सुरू होता. प्रजासत्ताक दिनाचे नियोजन कार्याचे पालकांनी कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे व उपशिक्षक नामदेव जानकर, संतोष महाले आणि सुरक्षारक्षक उमेश कांत निकम यांचे सहकार्य लाभले.