चलो बने आदर्श : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा क्रांतिकारी उपक्रम गणेश लोहार यांचा सुंदर लेख सविस्तर.
Table of Contents
काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा अमेरिकेतील तुरुंगाविषयक एक लेख वाचला नि डोळ्यावरची झापडं दूर झाली.
कारण अमेरिकेत तेथील लोकसंख्येच्या तुलनेत तुरुंगाची संख्या अधिक आणि सतत वाढणारी आहे, म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाणही वाढतं आहे.ते इतकं वाढतं आहे की शासनाला गुन्हेगारांसाठी पुरेसे तुरुंग उभारणे अशक्य झाले आहे.परिणामी खाजगी कंपन्यांना तुरुंग उभारण्याचा आणि ते चालवण्याचा परवानाही देण्यात आला आहे.अशा खाजगी तुरुंगांची संख्याही तेथे मोठी आहे.अमेरिकेसारख्या शिक्षणप्रेमी देशात सर्वाधिक तुरुंग असावेत.
हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका : सर्व शाळांमधून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आव्हान
ही गोष्ट "तुम्हाला तुरुंग बंद करायचे असतील तर,शाळा सुरु करा..." सुविचाराचं पितळ उघडं पाडणारी आहे.आता वाटते हा सुविचार कोणा शिक्षणमहर्षीचा नसून,नक्कीच एखाद्या शिक्षणसम्राटाचा अथवा त्यांच्या पाळीव बुद्धिजीवीच्या डोक्यातून आला असावा. आजवर आपण अमेरिकन शिक्षणपद्धती,तेथील अत्याधुनिक शाळा,भव्य ग्रंथालये,जगात सर्वात जास्त विद्यापीठं आणि संपूर्ण साक्षरता असलेला देश अशी ख्याती ऐकून होतो व तिचे गोडवेही गात होतो.
अशा अमेरिकेचं हे (कु)रुप भयचकित करणारं आहे.निरक्षरांची तुरुंगात रवानगी करुन काही अमेरिका शंभर टक्के साक्षर बनलेली नाही.शंभर टक्के साक्षरता असलेल्या देशातल्या तुरुंगातले सर्व कैदीही शंभर टक्के साक्षरच असणार!मग साक्षरता वाढीबरोबर गुन्हेगारीही वाढते असा निष्कर्ष काढायचा का?शाळा वाढल्या की तुरुंगही वाढतात,असं म्हणायचं का? होय,तसाच त्याचा अर्थ आहे.
हे ही वाचा: सरळ सेवा भरती : आदिवासी विकास विभागाकडून जाहिरात नक्की पहा.
गुन्हेगार जर साक्षर आहेत तर ते शाळेतूनच आलेले आहेत,म्हणजे दोष शिक्षणपद्धतीत आहे.शाळा जर बिनभिंतीचे तुरुंग असतील,तर समाजात तुरुंगाच्या भिंती उभ्या राहणारच.जर तसं असेल तर मग तुम्हाला तुरुंग बंद करावयाचे असतील,तर शाळा बंद करा,असं म्हणावं लागेल.हिटलरच्या छळछावणीतून निसटण्यात यशस्वी झालेले आणि बाल मानसशास्त्रज्ञ असलेले डॉ. हॅम गिनोत्त म्हणतात,"हिटलरच्या त्या छळछावणीत मी जे माझ्या डोळ्यांनी बघितले,ते जगात कोणाच्याही दृष्टीस पडू नये असे होते.
…तेथील गॅस चेंबर्स ज्यात माणसांना कोंडून मारलं जाई, ते बुद्धिमान इंजिनियर्सनी बनविले होते…
…बुद्धिमान आणि कुशल डॉक्टर मुलांना विष देत होते…
…प्रशिक्षित नर्सेस नवजात बालकांचा जीव घेत होत्या……
महाविद्यालयातनं पदव्या घेतलेले पदवीधर स्रिया आणि बालकांना गोळ्या घालत होते…हे सर्व पाहिल्यावर मी शिक्षणाविषयी अतिशय संभ्रमात पडलो आहे...मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांना आणि पाल्यांना माणूस बनवण्यासाठी मदत करा...लक्षात असू द्या तुमचं शिक्षण त्यांना प्रबुद्ध राक्षस, कुशल मनोरुग्ण आणि बुद्धिमान वेडे तर बनवत नाही ना? वाचन, लेखन, भाषा, इतिहास, गणित तोवरच उपयोगी आहेत, जोवर ते विदयार्थ्यांमध्ये मानवीमूल्य आणि माणूसकी विकसित करीत आहेत. तसं घडत नसेल तर सर्व शिक्षण हे कुचकामी आहे."आजचे विद्यार्थी शिकून सवरुन उद्या प्रबुद्ध राक्षस, कुशल मनोरुग्ण आणि बुद्धिमान वेडे तर बनणार नाहीत ना? हा खुप गंभीर मुद्दा आहे. पण आम्हाला त्याचं काही गांभीर्य वाटत नाहीये.
ही गोष्ट त्याहूनही गंभीर आहे.(हिटलरच्या ह्या छळछावणीत साठ लाख यहुदींना मारले होते) परंतु हीच गंभीरता हेरून व अभ्यासून महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिकचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी BAPS संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजावित व सदोदित चांगल्या विचारांचे सिंचन व्हावे यासाठी "चला बानुया आदर्श" हा उपक्रम महानगरपालिकेतील 100 शाळांमधील 28000 विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे.
हे ही वाचा: मुख्याध्यापक सोनजी गवळी हे लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
स्वामी ज्ञाननयदास यांनी असंस्कारितेचे गंभीर परिणाम व त्याची उदाहरणे देऊन संस्कारितेचे महत्व विषद केले.सुजय मोदींनी उपक्रम कसा असेल? कसा राबविला जाईल? त्यामध्ये आपली भूमिका काय असेल? अत्यंत मोजक्या शब्दात सांगितले.मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी एका क्रांतिकारी पर्वाची सुरुवात केली आहे,असेच म्हणावे लागेल,कारण शासन दरबारी अशी संवेदनशील लोक असतील तर भारतमातेला गतवैभव प्राप्त होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चांगल्या कार्याला होणारा विरोध हा सर्वज्ञात असताना, तो झुगारून त्यांनी हा निर्णय घेणे,पूर्णवेळ थांबून स्वतः प्रेक्षक बनून समजून घेणे, शेवटी मला जास्त ऐकण्याची सवय राहिलेली नाही असं सर्वांसमक्ष मान्य करणं सोपं नाही. संपूर्ण "चला बनुया आदर्श" हा उपक्रम समजून घेतल्यानंतर नाशिक परिक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा मानस ही त्यांनी बोलून दाखविला.
शब्दांकन – गणेश लोहार,(अथर्वदा फौंडेशन,नाशिक )