Disability: दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश व नियमित शिक्षण

Disability: विशेष गरज असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश व नियमित शिक्षणाबद्दल सविस्तर वृत्तांत

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दि.28 डिसेंबर 2016 रोजी केंद्र शासनाब्दारे Right of Person with Disability [दिव्यांग] (RPWD) Act 2016 अंमलात आला आहे. या अधिनियमातील प्रकरण, 2 कलम 3 पक्षापात व भेदभाव न करणे, प्रकरण 3, शिक्षण कलम 16, 17, व प्रकरण 6 कलम 31 अन्वये RTE Act 2009 चा संदर्भ नमुद करुन विशेष गरजा असणा-या दिव्यांग बालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दिव्यांगत्वच्या 21 प्रकारच्या विशेष गरजा असणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणाव्दारे मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे. दिव्यांग (Disability)

दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही शाळेमध्ये न भेदभाव करता प्रवेश दिला जातो. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभाग किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणेच दिव्यांग प्रमाणपत्र ही खूप महत्त्वाचे असते. प्रवेशावेळी विद्यार्थ्याच्या विशेष गरजांची माहिती घेतली जाते, जसे की दृष्टिहीन, श्रवणदुष्क, शारीरिक अपंग, मानसिकदृष्ट्या विशेष विद्यार्थी इ.

हे ही वाचा: हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार |

समावेशित शिक्षण (Inclusive Education) दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबरच शिकण्याची संधी दिली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिक्षकांची निवड केली जाते.ब्रेल लिपी, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, मोबिलिटी डिव्हाइस, ICT साधने यांची उपलब्धता शाळेमध्ये केली जाते.

NCERT व SCERT तर्फे दिव्यांगांसाठी विशेष व अनुकूल पाठ्यक्रम तयार केला जातो. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजानुसार योजना तयार केली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश उपलब्ध करून दिले जाते. शाळेमध्ये शौचालयाची विशेष सुविधा उपलब्ध केली जाते. वाहतूक भत्ता किंवा शाळेपर्यंत वाहतूक व्यवस्था व शिष्यवृत्ती दिली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्थसाह्य देखील केले जाते.

हे ही वाचा: गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात !

यामध्ये पालक व शिक्षकांची विशेष भूमिका असते. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच शिक्षकांनी शाळेमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे.शिक्षकांनी सहानुभूतीपूर्वक आणि तांत्रिक कौशल्याने अध्यापन करणे या भूमिका पालक व शिक्षकांनी पार पाडायला हवे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना व अनेक उपक्रम केले जाते.समावेशित शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियाना (SSA)
अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी, सहाय्यक साधने, घरगुती शैक्षणिक सहाय्य, पालक प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीचथेरेपी केली जाते.

हे ही वाचा: हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार |

सर्व विशेष गरजा असण-या दिव्यांग बालकांना नजिकच्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यता प्राप्त शाळांमध्ये वयाच्या 18 वर्षापर्यंत सुयोग्य संचारमुक्त वातावरणात शिक्षण पुर्ण करण्यासाठी नियमित शाळेत प्रवेश व शैक्षणिक सहय्यभूत सेवा उपलब्ध करुन देऊन शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकांची आहे. दिव्यांग (Disability)

हे ही वाचा: गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात !

तसेच विशेष गरजा असण-या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्याच्या तक्रारीचे निवारण करणे व त्यांना आवश्यक सोई सुविधा देणे, दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 (The Rights of Person with Disability Act. 2016) नुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेश संबंधी सर्व बाबीं बाबत आणि अधिनियमातील कलम 16, 17 व 31 अन्वये शाळांमध्ये उपलब्ध करुन द्यावयाच्या सोयी सुविधांची अंमलबजावनी करण्यासाठी राज्यस्तरावर सहसंचालक (प्रशासन) शिक्षण आयुक्तालय, पुणे व जिल्हा मनपास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना नोडल अधिकारी तसेच कलम 23 अन्वये तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत. दिव्यांग (Disability)

हे ही वाचा: डिजिटल जनगणना : केंद्र सरकार द्वारे दोन टप्प्यात करण्यात येणार

तरी सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, व ज्युनियर कॉलेज, यांच्या मुख्याध्यापकांनी विशेष गरजा असणा-या दिव्यांगाच्या 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणाब्दारे मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे. व 18 वर्षापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना सुयोग्य संचारमुक्त वातावरणात शिक्षण पुर्ण करण्यासाठी नियमित शाळेत प्रवेश व शैक्षणिक सय्यभूत सेवा उपलब्ध करुन देऊन शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांची आहे.
तरी उपरोक्त संदर्भातील शासन निर्णया नुसार सर्व मुख्याध्यापक यांनी नोंद घेउन नाशिक मनपा क्षेत्रातील एक ही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी.दिव्यांग (Disability)

Leave a Comment