नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर येथे काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त “पुस्तक वाचन” उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेबरोबरच अस्पृश्यता निर्मूलन कार्य व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याचे बहुमुल्य कार्य आपल्या बहुमूल्य आयुष्यात केले. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल 6 डिसेंबर रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये विद्यार्थ्यांसाठी “पुस्तक वाचन” उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना गटागटामध्ये बसवून त्यांना ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी देण्यात आलेली होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मुलांना यावेळी सांगण्यात आले.मुलांनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषणे केली त्याचबरोबर त्यांच्या जीवनावर गाणे सुद्धा गायिली.शाळेतील सर्व शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मुलांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा : दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा : नाशिक महानगरपालिका
या उपक्रमाचा उद्देश हाच होता की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाचनाचे,पुस्तकचे महत्त्व सांगितले आहे. पुस्तके आपल्याला जीवनात किती महत्वाची आहेत याबाबत त्यांनी लोकांना संदेश दिला आहे. हा वाचन संस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांवर व्हावा त्याचबरोबर त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
हा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रामध्ये मध्ये घेण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका लता सोनवणे,कल्पना पवार,दिपाली काळे उपशिक्षक नामदेव जानकर,संतोष महाले,ईश्वर चौरे आणि सुरक्षारक्षक उमेशकांत निकम यांनी सहकार्य केले.सकाळ सत्र व दुपार सत्रातील सर्व शिक्षिका आणि शिक्षक यांचे सहकार्य लावले.