प्रवेशोत्सव : पंचवटी येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
पंचवटी येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.मनपा शाळांची पटसंख्या वाढीसाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मनपा शाळा प्रवेश व शिक्षणाविषयी जागृती या दोन्ही गोष्टी साध्य होतात. सर्वजण गुणवत्ता वाढीसाठी झटणारे शिक्षक या केंद्रात आहेत.याचबरोबर प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी ठेवणारे शिक्षक या केंद्रात आहेत, परंतु प्रश्न येतो तो पटाचा. जून महिन्यात पटाची टांगती तलवार शिक्षकांच्या डोक्यावर असते, विविध प्रकारे पट कसा वाढावा यासाठी प्रयत्न चालू असतात.
त्यात मध्य नाशिक, पंचवटी या विभागात तर पटाचा मोठाच प्रश्न निर्माण होतो आणि हेच हेरून धडाडीचे प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनाने केंद्रप्रमुख दिपक पगार, साहेबराव महानुभाव व सुनिल खेलुकर या तिघांनी मिळून पाच केंद्रांचे एकत्र शिस्तबद्धरित्या नियोजन करून प्रवेश दिंडीचा 20 मार्च रोजी आडगाव येथे शुभारंभ केला.
हे ही वाचा: शिवजयंती : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न
या प्रवेश दिंडीचे नियोजन करताना पाचही केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांना विश्वासात घेऊन वारंवार त्यांच्या मिटींग घेऊन उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
सर्वांचे लक्ष वेधणारा चित्ररथ, मनपा शाळांची सर्वसमावेशक माहिती सांगणारे कलापथक, त्यांची वेशभूषा वाखाणण्याजोगी होती.
या प्रवेश दिंडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका शाळेचा किंवा एका केंद्राचा विचार न करता नांदूर मानूर पासून ते मखमलाबाद गावापर्यंत सर्वत्र गल्लीबोळातून ही प्रवेश दिंडी फिरत होती आणि पालकांचे प्रबोधन करत होती.
सर्व दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे स्वतः केंद्रप्रमुख दीपक पगार आणि साहेबराव महानुभाव. यांच्या दिंडी चालली या गीताने पालकांना चौकसभेकडे खेचून घेतले. दोन्ही केंद्रप्रमुखांचा दमदार आवाज, गीताचे बोल मनपा शाळा विषयी खूप काही सांगून जात होते. ज्या ज्या ठिकाणी हा प्रवेशोत्सव होत होता, त्या ठिकाणच्या आकर्षक रांगोळ्या, लेझीम पथक, पथनाट्य पथक आणि विविध वेशभूषेतील विद्यार्थी यांनी दिंडीला वेगळीच रंगत आणली.
हे हि वाचा: सावित्रीबाई फुले म.न.पा शाळा क्र.७८ (ISO मानांकित) शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न
अशा प्रकारच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थाने पंचवटीचा प्रवेशोत्सव साजरा झाला. हा उपक्रम म्हणजे मनपा शाळांच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती असा प्रवेशोत्सव झाला आणि या सर्वांचे श्रेय प्रशासनाधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना जाते.
हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 व 87 पाथर्डीगाव चे NMMS परीक्षेत भरघोस यश.
पंचवटी विभाग प्रवेशोत्सव अश्वमेध नगर येथील दिंडीचे व चौक सभेचे फक्त एका वाक्यात वर्णन- “अवर्णनीय प्रवेशोत्सव जेथे १५०/२०० पालक चौक सभेसाठी उन्हात पण तरीही उत्साहात नाविन्यपूर्ण वेशभूषेत वाट पहात १० वाजेपर्यंत बसले होते आणि ते १२ वाजेपर्यंत नाचले गायलेत दिंडीत सामील झाले”
या कार्यक्रमात प्रशासनाधिकारीबी.टी.पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले.शिक्षकांविषयी गौरव उद्गार यावेळी त्यांनी काढले.त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.