नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 व 87 पाथर्डीगाव चे NMMS परीक्षेत भरघोस यश.

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 व 87 पाथर्डी गाव येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

 नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील मनपा शाळा क्रमांक 86 व 87 या शाळा गुणवत्तेच्या बाबत अग्रेसर असलेल्या दिसून येतात. Nashik Municipal Corporation School No. 86 and 87 Pathardigaon

 यापूर्वी ही विविध परीक्षेमध्ये या शाळांनी आज पर्यंत उल्लेखनीय  यश मिळवलेले आहे, यावरून असे दिसून येते की नाशिक महानगरपालिकेच्या शाळा या कुठेही खाजगी क्षेत्राच्या शाळांच्या तुलनेत प्रगती बाबत मागे नाहीत.

हे ही वाचा : लेक लाडकी : ही योजना काय आहे जाणून घ्या

 नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 ही मुलींची शाळा असून, 87 ही मुलांची शाळा आहे.शाळा क्रमांक 86 मधील 36 मुली आणि शाळा क्रमांक 87 मधील आठ मुले या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

हे ही वाचा : दहावी नंतर कोणती 8 कौशल्ये विकसित होणे आवश्यक

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी पुढील जीवनात यशस्वी कसे व्हावे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले,विद्यार्थ्यांनी ते मनापासून ऐकले.या कार्यक्रमात केंद्रसमन्वयक ईश्वर चव्हाण, मुख्याध्यापक दीपक मानकर व विलास दांडगे हे उपस्थित होते.

हे ही वाचा : NPS : एनपीएसमधून पैसे काढतांना नवीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

त्याचबरोबर वर्गशिक्षक कविता पाटील,सविता खैरनार,अनंत जगताप हेही उपस्थित होते. तसेच यापूर्वी  NMMS परीक्षेत यश  मिळवून देणारे शिक्षक येवला,तांबे यांचा ही  सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा क्रमांक 86 व 87 या दोन्ही शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर बागड यांनी यांनी केले.

Leave a Comment