महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत येणारी सातपूर मधील मनपा शाळा क्रमांक 33 महादेव नगर या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केंद्र शासन महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार शाळांमध्ये विविध उपक्रम पार पडले.
स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीतल अहिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिक शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी माननीय नगरसेवक योगेश भाऊ शेवरे माननीय नगरसेविका सौ दीक्षा ताई लोंढे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रसाद झोंबाड अरुण भाऊ काळे विजय अहिरे संजय तायडे संदीप शिंदे छाया तेलुरे सुनंदा खरोटे अजिंक्य तेलोरे उज्जीवन पतसंस्था उपेंद्र नगर, माता पालक गट आणि बहुसंख्येने महादेव नगर आणि सातपूर भागातील नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिका शाळा क्रमांक 33 महादेव नगर येथे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध वेशभूषा करून आलेले होते. शाळेचे विद्यार्थी व संपूर्ण शिक्षक वृंद यांनी परिसरातून प्रभात फेरी विविध घोषणेसह काढण्यात आली. भारतमातेच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता प्रभात फेरीनंतर विविध उपक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात आले. यामध्ये मुलांचे संस्कृती कार्यक्रमांतर्गत नृत्य सादर करण्यात आले. त्याचबरोबर मेरी मिट्टी मेरा देश पंचप्राण शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर बाल सभेची स्थापना व त्याचा शपथविधीही घेण्यात आलेला होता.
सर्व मान्यवरांच्याकडून यावेळी एक मूठ माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली व ती माती एका कलशात एकत्र करण्यात आली. विद्यार्थ्याने अनेक सुंदर नृत्य सादर केली त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांकडून या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस ही जाहीर करण्यात आले. शुभम शिवाजी पाईकराव यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या सुंदर वक्तृत्वाचे कौतुक करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सौ सुनंदा खरोटे व अजिंक्य तेलुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन रवींद्र पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्पावती मेतकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी अर्थात भगवान सोनार संजय सोनवणे मंगला शेलार उज्वला आहे प्रमिला अहिरे काजल अहिरे जितेंद्र प्रभाळे, दत्तात्रय वाळके यांनी सहकार्य केले.