शालेय पोषण आहारात नवीन पाककृतींचा समावेश या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार माहे ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ पासून विद्यार्थ्यांना लाभ देणार.
शैक्षणिक वर्ष 2024-25 अन्न शिजवून देण्यात आलेले आहेत. योजनेस पात्र असलेल्या सर्व शाळांबाबत पाककृती निश्चित करुन विद्यार्थ्यांना शाळास्तरावर आहार शिजवून देण्याकरीता पाककृती निश्चित करण्यात आली आहे. पोषण आहार
सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्याच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील.
तीन संरचित पद्धतीमध्ये तांदुळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदुळाची खीर/नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. सदर पाककृतीचा तपशील परिशिष्ट “अ” प्रमाणे राहील.
सुधारीत पाककृतीनुसार प्रत्येकदिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्तयातील अ.क्र. 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दोन आठवडयामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल.
पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खादयपदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्रशासनाने निश्चित केलेनुसार आहे. सदर प्रमाणानुसार शिजविलेला आहार विद्यार्थी पुर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदुळाची पाककृती तयार केल्यास तांदुळ व डाळी / कडधान्य यांची बचत शक्य आहे.
हे ही वाचा: 78 वा स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिका धृवनगर शाळा क्रमांक 22 मध्ये उत्साहात संपन्न
तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदुळ व कडधान्य/डाळ यांचे प्रमाणे निश्चित करणे आवश्यक आहे. (इ.1 ली ते 5 वी साठी तांदुळाचे प्रमाण 50 ग्रॅम (50%) घेतल्यास कडधान्य/डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाण त्याच मर्यादेत (50%) निश्चित करावे.)
तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलांव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदुळाची खीर/नाचणी सत्व देण्यात यावेत.
विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात यावेत.
विद्यार्थ्यांना आठवडयातील चार दिवसांकरीता दररोज तांदुळाची खीर व आठवडयातील एक दिवसा नाचणीसत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबतत देण्यात यावा.
ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवडयातून एकदा अंडा पुलाव या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे त्या दिवशी इ.1 ली ते 5 करीता 100 ग्रॅम तांदुळ व इ.6 वी ते 8 वी करती 150 ग्रम तांदुळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत.
सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊटस) देण्यात येऊ नये.
हे ही वाचा: जुन्या पेन्शन बाबत शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “तपासणी समिती” गठित होणार
गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदुळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तु पुरवठादारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तुंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ/साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर करण्यात येईल.
योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळया पदार्थांचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता कार्यवाही करण्यात यावी.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संदर्भिय पत्र दि.25/06/2024 नुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत माहे ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मधील 49 दिवसांकरीता पाककृतीस मान्यता घेण्यात आली असून खालीलप्रमाणे पाककृती निश्चित करण्यात आलेली आहे.
अधिक माहिती साठी खालील pdf वाचा.