नायलॉन मांजाचा वापर आणि पर्यावरण संरक्षण कायदा याविषयी गंभीर माहिती याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
Table of Contents
नायलॉन मांजा पर्यावरणाच्या व मानवी जीविताच्या दृष्टीने खूप घातक गोष्ठ आहे. याबाबत जागृती होणे खूप महत्त्वाचे आहे. याबाबत नाशिक शहर पोलीस यांनी पर्यावरण संरक्षण कायदा व नायलॉन मांजाचा वापर याविषयी एक नुकतेच परिपत्रक काढलेले आहे. या परिपत्रकात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने मानवी जीवितास कसा धोका निर्माण झालेला आहे व पर्यावरणाचा कायदा लोकांना माहीत नसल्याने त्याबाबत जागृती करण्याचे कार्य नाशिक शहर पोलिसांनी केलेले आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत.
हे ही पहा :
१ ) मनाई आदेशात नव्याने नायलॉन मांजाची निर्मिती, विकी, साठा व वापर यावर प्रतिबंध आवश्यक आहे.
२) ज्याअर्थी, कोणी व्यक्ती शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठया किंवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा पध्दतीचा नायलॉन मांजा बाळगेल, वापर करेल अशा व्यक्तींवर देखील सदरचा आदेश लागु राहील.
३) ज्याअर्थी, मकर संक्रांती सणा निमित्त नाशिक शहरात डिसेंबर व जानेवारी महिण्यात मोठ्या प्रमाणात पंतग उडविल्या जाते त्यात वापरण्यात येणारा मांज्या (दोरा) हा नायलॉनचा असल्याचे निदर्शनास आले आहे. मांजाचे (दोऱ्याचे) घर्षण होऊन मांजा तुटून मोठया प्रमाणात उंच झाडे व इमारतीमध्ये अडकतो व त्यामुळे वन्य पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होऊन, वन्य पक्षी, प्राणी तसेच नागरिक जखमी होण्याचे प्रमाण व प्राण गमाविण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे गेल्या काही दिवसामध्ये रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार व शाळेतील सायकलवरील विदयार्थी हे अपघात होऊन त्यात ते जखमी झालेले आहे. नायलॉन मांजा लवकर तुटला जात नाही व त्याचा नाश होत नाही. तसेच नायलॉन माजा मुळे विजेच्या तारांवर घर्षन होवुन ठिनग्यांनी आग लागुन विज प्रवाह खंडीत होतात, विज केंद्र बंद होतात इलेक्ट्रीक उपकरणांना बाधा पोहचते व त्यातुन अपघात होतात त्याचे दुष्परीणामामुळे पर्यावरणाची हानी होत असते.
हे ही वाचा : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक साठी समृद्धी कार्यक्रम
४) ज्याअर्थी दिनांक २८/१२/२०२० रोजी नायलॉन मांजामुळे मान कापली जावुन महिलेचा मृत्यु झाले बाबत भद्रकाली पो स्टेशनला गु.र.न ५१३/२०२० भादविक ३०४(अ), ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल आहे. अशा स्वरूपाची घटना घडली आहे व यापुढे अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५) ज्याअर्थी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १ व २ यांनी मकर संक्रांती सणानिमित्त नाशिक शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन दोऱ्याच्या निर्मिती, विकी, साठा व वापर यावर बंदी घालण्याचे मनाई आदेश पारीत होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पतंगांना वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन दोन्याच्या निर्मिती, विकी, साठा व वापरास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये बंदी मनाई आदेश पारीत होणेस विनंती केली आहे.
६) त्याअर्थी मी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून असा आदेश निर्गमित करीत आहे की, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खबरदारीचा उपाय म्हणून पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा-या मांजासाठी नायलॉन दोरा, ज्या मांजांना काचेची कोटिंग आहे अशा टोकदार व धारदार चायनीज मांजा यांची निर्मिती, विकी, साठा व वापर यावर बंदी घालत आहे.
हे ही वाचा : Know Your Army with Bhonsala हा कार्यक्रम काय आहे ?
७) सदर आदेश हा दिनांक ०४/१२/२०२४ रोजी ००:०१ वाजेपासून दिनांक १८/१२/२०२४ रोजीचे २४:०० वाजेपावेतो अंमलात असेल. या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ या कायदयाचे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील.
८) सर्व संबधीतांना या आदेशाची व्यक्तीशः बजावणी करणे शक्य नसल्यामुळे सदरचे आदेश हे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये सर्व जनतेच्या माहितीसाठी या आदेशाची प्रसिध्दी स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक वृत्त प्रसारण वाहीन्या (लोकल न्युज चॅनल) तसेच पोलीस आयुक्त, नाशिक शहर कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त व सर्व पोलीस ठाणे यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच स्थानिक वस्तीतील प्रमुख ठिकाणी चिकटवून प्रसिध्द करण्यात येत आहे.
९) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्य, व्यक्तीस, किंवा मालमत्तेस भय, धोका, किंवा ईजा, निर्माण करतील किंवा त्यापासुन भय, धोका, किंवा ईजा उत्पन्न होण्याचा संभव आहे. अशा व्यक्तीवर तडीपार करण्याची कार्यवाही पो.उप.आयुक्त परीमंडळ १, २ व गुन्हे, नाशिक शहर हे आप आपल्या कार्याक्षेत्रात या अनुषंगाने कार्यवाही करतील.
१०) सदर आदेशाचे अपुपालन कसुर केल्यास किंवा उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती/संस्था या पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नमुद शास्तीस पात्र होतील.
११) “महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम १६३ मधील तरतुदीप्रमाणे या आदेशाची अंमलबजावणी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील स्थानिक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी करतील. हा आदेश आज दिनांक ०३/१२/२०२४ रोजी माझे सही व शिक्यानिशी पारित केला आहे.