“शिक्षण सप्ताह” बाबत महत्वाची माहिती सविस्तर जाणून घ्या
Table of Contents
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
शिक्षण सप्ताह दिवस पहिला
सोमवार दि. 22 जुलै, 2024.
प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक
3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी आणि 12 वी):
1.घोषवाक्ये असलेले पोस्टर्सः “पाणी कसे वाचवायचे” आणि “इतरांना कशी मदत करावी” यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स वनविणे.
2.कोडी: विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक लव केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे.
3.खेळ (मैदानी/शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शास्त्रे, विज्ञान, गणित आणि भापां इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.
4.त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा) यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे.
हे ही वाचा: काय आहे महावाचन उत्सव ? जाणून घ्या
5.बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवर (कापड किंवा पुठ्यावर) खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील
खेळ तयार करणे.
6.भिंतीवरील तक्तेः महत्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे.
7.वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.
3.2 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता 6 वी आणि 10 वी):
1.कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.
2.खेळः ल्युडो सारखे इतर खेळ तयार करणे.
3. खेळणीः कागद आणि वांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक
साहित्यापासून खेळणी बनविणे.
4. कठपुतळी/बाहुलीनाट्यः कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे.
3.गोष्टीचे कार्डस (Story Cards): पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार
करणे.
हे ही वाचा: ध्रुवनगरच्या मनपा शाळा परिसरात आषाढी एकादशी दिंडी सोहळा अवतरला !
4.तक्ते बनविणेः “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक जारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनविणे.
5.शिक्षण सप्ताह मध्ये वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.
3.3 पूर्वतयारी स्तर (इयत्ता 3 री ते 5 वी):
1. तक्ते बनविणेः “अन्न आणि भाजीपाला”, “स्थानिक बाजारपेठ”, “माझे कुटुंब” इत्यादी विपयाचे तक्ते बनविणे.
2.रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात.
3. फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.
4.मुखवटेः प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे.
5.वाचन कट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे.
3.4 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी (वय वर्ष 3 ते 6) आणि इयत्ता 1 ली व 2 री):
1.आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या उदा. PSE Kit, महाराष्ट्राचा जादुई पिटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तसेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात.
2.पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे.
3.विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील.
हे ही वाचा: महाज्योती योजने मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा कसा मिळवाल
4.पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे.
5.गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.
प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना
शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. शिक्षण सप्ताह च्या या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत.
1.वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत. – प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला “चला शिकूया भित्तिपत्रकातून” तर गोष्टीच्या स्टॉलला, “चला गोष्टी ऐकूया”, कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला “जर खेळणी बोलू लागली तर” अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.
2. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे.
3.संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन -अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे.
4.हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.
5.शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, वाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे.
6.दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.
शिक्षण सप्ताह दिवस दुसरा
मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथनिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व
गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः
१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम
२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)
३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य चे विकसन
४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन
५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांगे इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.
- बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकरन
- अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती.
- समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.
- शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.
- सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.
उदिष्टे :
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :
- कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण
- अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा/परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे.
बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :
1.पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.
2.वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.
3.जादुई पिटारा/PSE कीट: शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.
4.वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.
5. विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन
करावयास लायाये व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित वेविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास
प्रोत्साहन देता येईल.
6. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा. पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्क्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.
7. शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या य भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजायटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व यायावत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.
8. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्य व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.
9. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.
11. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
12. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.
समुदायाचा सहभाग:
- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८, ११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.