राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत मनपा शाळा क्र.77 अंबड शाळेतील विद्यार्थी चेतन पवार ने पटकावले कास्य पदक.

राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत मनपा शाळा क्र.77 अंबड शाळेतील विद्यार्थी चेतन पवार ने पटकावले कास्य पदक. या विषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमधील विद्यार्थी हे अष्ठपैलू आहेत.महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच कला,क्रिडासह अनेक क्षेत्रातील स्पर्धेत सहभाग घेत असतात आणि आपला ठसा उमटवत असतात. यासाठी त्यांना शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत असते.नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या 13 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेमध्ये मनपा शाळा क्र.77 अंबड शाळेतील विद्यार्थी चेतन पवार ने कास्य पदक पटकावून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे नाव राज्यस्तरावर पोहोचवले आहे.याचा शिक्षण विभागातील सर्व शाळांना अभिमान आहे.

हे ही वाचा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या रूपाने चळवळीतील एक तेजस्वी तारा निखळला.

राज्यस्तरीय
राज्यस्तरीय

13 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन ने दि.1 व 2 ऑक्टोबर 2023 रोजी राज पॅलेस,करवीर ता.जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले‌.
आमदार जयश्री जाधव कोल्हापूर, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुलीं साठी घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील ४३८ खेळाडू सहभागी झाले होते.

हे ही वाचा

CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ


स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले ,मुंबई झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन, सुरेखा येवले, अध्यक्षा, नवी मुंबई पिंच्याक सिलॅट असोसिएशन, अनुज सरनाईक, साहेबराव ओहोळ, अरविंद शिर्के, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
८ सुवर्ण, ११ रौप्य, ६ कांस्य पदक नाशिक संघाने प्राप्त केले.

या सर्व खेळाडूंची बिहार मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे करता निवड झाली आहे. आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या खेळाडूंना नागेश बनसोडे( नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशन सचिव) यांनी मार्गदर्शन केले.

हे ही वाचा

वाषाण जिल्हा परिषद शाळेत डफळापूर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

विजयी खेळाडूंची नावे

इंद्रा बनसोडे याने 3-6 वयोगटात तुंगल या प्रकारात (सुवर्ण )पदक मिळवले व टेंडिंग या प्रकारात(रौप्य )पदक मिळवले व पर्व उबाळे ने (सुवर्ण) पदक मिळवले. 10 -11 या वयोगटात विराज कवडे याने (सुवर्ण) पदक मिळवले. तसेच रेगु या प्रकारात अथर्व बर्वे, अर्णव विधाते व विराज कवडे यांनी (रौप्य) पदक मिळवले. 12-13 या वयोगटात अर्णव गवई ( सुवर्ण), चेतन पवार ( कास्य) , आर्यन पटेल ( कास्य) पदक मिळवले तसेच दक्ष विश्वकर्मा ने तुंगल प्रकारात ( कास्य) पदक मिळवले.14-16 या वयोगटात तनिष्क गवई (सुवर्ण), गणेश खंडेराव ( रौप्य), प्रेम विश्वकर्मा ( कास्य) पदक मिळवले. तसेच तुंगल या प्रकारात देखील प्रेम विश्वकर्मा ( कास्य) याने पदक मिळवले.


▫️पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला ‘युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार’, ‘भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो.

हे ही वाचा

सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

मनपा शाळा क्र.77 अंबड शाळेतील कास्य पदक विजेता चेतन दशरथ पवार यांस त्याचे प्रशिक्षक नागेश बनसोडे, पालक दशरथ पवार, विविध उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बापूसाहेब पाटील, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख विजय कवर,वर्गशिक्षिका रुपाली चव्हाण,तसेच शालेय सहकारी निलिमा फलके, राजाराम चौरे, वंदना अरसुळे, सुनील सोनवणे, रत्नाकर गवारी, भारती गवळी, निर्मला देवरे, जयश्री मराठे, मनिषा बांगर, संजय सानप, संजय गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment