राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार NATIONAL TEACHERS’ AWARDS : नामांकन नोंदणीची मुदतवाढ

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार NATIONAL TEACHERS’ AWARDS : नामांकन नोंदणीची मुदतवाढ

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 या वर्षासाठी पात्र शिक्षकाकडून ऑनलाईन स्व नामांकन नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 18 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र शिक्षकांना 21 जुलै 2024 पर्यंत त्यांचे स्व नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. शिक्षण मंत्रालयाकडून 27 जून 2024 पासून नामांकन मागवण्यात आले होते.

या वेबसाईटवर नामांकन मागवण्यात आले होते. http://nationalawardstoteachers.education.gov.in

या पुरस्कारासाठी तीन टप्प्यात शिक्षकांची निवड केली जाणार आहे. हे टप्पे अनुक्रमे जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय असे असणार आहेत. या टप्प्यातून पन्नास शिक्षकांची निवड केली जाणार आहे. शिक्षक दिना दिवशी पार पडणाऱ्या विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार या 50 शिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडण्यात आलेल्या या सर्वोत्तम शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

हेही वाचा :7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळणार

सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करणे, आपल्या वचन पद्धतीने आणि कार्यक्षमतेने केवळ शालेय शिक्षणाचा दर्जा न सुधारता आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना गौरव करणे हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहे. 

पात्रतेचे काही निकष आहेत ते खालील प्रमाणे 

राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश प्रशासन,स्थानिक स्वराज्य संस्था द्वारे चालवल्या जाणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक/ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि राज्य केंद्रशासित प्रदेश मंडळाशी सलग्न मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शाळा प्रमुख या पुरस्कारासाठी प्राप्त आहेत.

केंद्र सरकारच्या शाळा उदा. केंद्रीय विद्यालय, जव्हार नवोदय विद्यालय, संरक्षण मंत्रालया द्वारे संचलित सैनिक शाळा ऑटोमीक एनर्जी एज्युकेशन सोसायटी द्वारे चालवण्या जाणारे शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि कौन्सिल फॉर इंडियन स्कूल, सर्टिफिकेट एक्झामिनेशन यांच्याशी संलग्न शाळा,या शाळा मधील शिक्षकांना यामध्ये सहभाग घेता येईल.

Leave a Comment