अभिमानास्पद : गणेश लोहार मानद डॉक्टरेट ने सन्मानित !

अभिमानास्पद : गणेश लोहार मानद डॉक्टरेट ने सन्मानित ! याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील एक अष्ठपैलू व्यक्तिमत्व गणेश लोहार यांना नुकतेच त्यांच्या विविध कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.शिक्षक असलेले गणेश लोहार यांना भारतीय संस्कृती, योग , खेळ व पर्यावरण पूरक जीवनशैली प्रचार व प्रसार कामाविषयी आवडही आहे.

भारतीय संस्कृती, योग व खेळ क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल देवेंद्रकुमार जैन (निवृत्त न्यायाधीश), दीपा मिश्रा (कथाकार मथुरा) विश्वनाथ पाणीग्रही (पर्यावरण तज्ञ) विश्नुकांत कनकने (शिक्षा विभाग मप्र) यांच्या हस्ते मानद (ऑनररी) डॉक्टरेट पुरस्कार स्विकारतांना डॉ.गणेश लोहार.

हे ही वाचा : नायलॉन मांजाचा वापर आणि पर्यावरण संरक्षण कायदा याविषयी गंभीर माहिती

आतापर्यंत केलेल्या सर्व सायकलिंग मोहिमेत विश्वविक्रमी सायकलिस्ट गणेश लोहार पितापुत्रांनी शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूट, गाव, वस्ती यांमध्ये चौक सभा व प्रत्यक्ष संवाद साधून भारतीय संस्कृती, योग , खेळ व पर्यावरण पूरक जीवनशैलीचा प्रचार व प्रसार केला आहे.

त्याबद्दल गणेश लोहार यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाने ( मथुरा, उत्तर प्रदेश) मानद डॉक्टरेट ही पदवी इंदोर येथे रविवारी ( दि.२२) संपन्न झालेल्या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

हे ही पहा : असे होतात नाशिक मनपा शाळेत शनिवारी उपक्रम

कार्यक्रमास देवेंद्रकुमार जैन (निवृत्त न्यायाधीश), सुश्री दीपा मिश्रा (कथाकार, मथुरा) विश्वनाथ पाणीग्रही (पर्यावरण तज्ञ) , विष्णुकांत कनकने ( शिक्षण विभाग, मध्य प्रदेश ) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गणेश लोहार यांनी सायकलिंग मध्ये पाच रेकॉर्ड केले असून, त्यांना श्री गजानन महाराज संस्थेचा समाजभूषण, आधार रत्न, सम्राट गोकुळधाम रत्न असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

हे ही पहा : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक शिक्षक स्तरावर समृद्धी कार्यक्रम

त्यांनी गोदातीरावरील संजीवन समाध्यांचा योग दृष्टिकोनातून अभ्यास व नाशिक- कन्याकुमारी- नाशिक या विश्वविक्रमी सायकलिंग मोहिमेमध्ये योगसाधनेचा झालेला फायदा हे दोन शोधनिबंध त्यांनी सादर केलेले आहेत. भारतीय संस्कृती, योगाभ्यास व पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा प्रचार, प्रसार केलेला आहे व करीत आहेत.

त्यांनी सप्तमोक्षपुरी हे पुस्तक देखील लिहिले आहे, जे सर्व मनपा शाळांना राजेंद्रजी वानखेडे यांच्याकडून मोफत देण्यात आलेले आहे.

हे ही पहा : Face Reading : व्यक्तीचा चेहरा कसा वाचावा ?

नि:स्वार्थ संस्कारवर्ग, योगसाधना वर्ग, ट्रेकिंग व सायकलींगचे आयोजन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व समाजात नीतिमूल्ये प्रस्थापित करण्यासाठी जाणीवजागृती कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजनही ते करीत असतात.
महानगरपालिकेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी योगसाधना, प्राणायाम, ध्यान, आनापानसतीचीही कार्यशाळा त्यांनी घेतलेली आहे. अशा कार्यशाळा ते इण्डस्ट्रीज, इन्स्टिट्युटस्, शाळा, कॉलेजेस मध्ये नि:स्वार्थपणे घेत असतात.

अशा अनेक सामाजिक, आध्यात्मिक व वैचारिक कार्याची नोंद घेऊन गणेश लोहार यांना मानद डॉक्टरेट पदवी इंदोर येथे कार्यकर्तृत्ववान महानुभवांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आली.

Leave a Comment