CMP प्रणाली द्वारे वेतन या कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती पहा.
Table of Contents
महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनाबाबत अनेक समस्या होत्या.मासिक वेतन फाईल या अनेक टप्प्यातून आणि विविध प्रक्रियेमधून जात असल्याने या कर्मचा-याना मासिक वेतन मिळण्यास विलंब होत असे.याबाबत अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त होत होत होत्या, याची दखल घेऊन राज्यशासनाने नवीन प्रणाली विकसित केली आहे, त्या वेतन प्रणाली चे नाव CMP असे आहे.Now these employees will get salary through CMP system Circular issued
हे ही वाचा
दिनांक २२ /8/२०२३ रोजी परिपत्रकाद्वारे राज्यातील शैक्षणिक कार्यालयांना कळविण्यात आले आहे कि,जिल्हा परिषद / महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रदान सीएमपी CMP प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हे ही वाचा
मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल.
याबाबत तांत्रिक बाबी, Testing प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी जालना व चंद्रपूर या जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील व खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच औरंगाबाद व नागपूर विभागातील महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहे ऑगस्ट, २०२३ चे वेतन प्रायोगिक तत्वावर सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची कार्यवाही करावी.
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत.
हा एक शासनाने घेतलेला चांगला निर्णय आहे.त्यामुळे वेतनास होणारा विलंब नाहीसा होणार आहे.उशिरा का होईना हा निर्णय घेऊन या कर्मचा-यांना सुखद धक्का दिला आहे.