22 जानेवारीला राम मंदिराच्या (Ram mandir) उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असणार मुख्यमंत्र्यांचा निर्णय या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराच्या (Ram mandir) उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातही राज्य सरकारकडून (state goverment) शाळेला स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारीला सर्व शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा: अग्निवीरवायू भरती सुरु : लगेच अर्ज करा.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीरामलालांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून सर्वांना याचा आनंद आहे. सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याने कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पत्राद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टीची मागणी केली होती. मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश मिळाले व राज्यभर एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
कोणत्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे
महाराष्ट्रसह गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये देखील 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे.
हे ही वाचा: FASTtag जाणार काळाच्या पडद्याआड | नवीन GPS प्रणाली कोणती ? कशी?
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन आहे, त्या आधी राम मंदिराचे अनुष्ठान देखील करण्यात येईल. राम मंदिराचे अनुष्ठान हे 21 जानेवारीपर्यंत संपन्न होणार आहे. या अनुष्ठानानंतर 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल.
केंद्र सरकारकडून हाफ डे करण्याचा निर्णय
22 जानेवारी रोजी सर्वत्र रामप्रतिष्ठापनेचा उत्साह व आनंद साजरा करण्यात येणार आहे. उत्साहात सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सहभाग घेता यावा म्हणून या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारकडून हाफ डे देण्याचा निर्णय घेतला आहे.