भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त भारत सरकारकडून विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे “हर घर तिरंगा”.
हा उपक्रम कशा पद्धतीने स्थानिक पातळीवर साजरा केला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
हे ही वाचा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमाची अंमलबजावणी मागील वर्षी सुध्दा अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.How is the activity “Har Ghar Tiranga” going to be under the Amrit Mahotsav of Independence?
त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२३ ते दि. १५/०८/२०२३ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
हे ही वाचा
नाशिक सायबर पोलिसांचा “सायबर दूत” उपक्रम काय आहे जाणून घ्या : महाराष्ट्रातून होत आहे कौतुकाचा वर्षाव
सदर उपक्रमाचा उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.How is the activity “Har Ghar Tiranga” going to be under the Amrit Mahotsav of Independence?
त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत अशी अपेक्षा आहे. याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यांनी सूचित केलेले आहे.
हे ही वाचा
तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल विभागाने यापूर्वी दिल्या प्रमाणे ऑनलाइन फॉर्म द्वारे देण्यात यावा असे अवगत करण्यात आले आहे.