नाशिक मनपा क्षेत्रात “मेरी मिट्टी, मेरा देश” अभियान : आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे नियोजन.

सध्या राज्यात व देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. संपूर्ण वर्षभर शिक्षण विभागातर्फे अनेक उपक्रमांचे शाळाशाळांमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने “मेरी मिट्टी, मेरा देश” या एका नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या उपक्रमांतर्गत

१. अमृत सरोवर / जल स्रोताशेजारी शिलाफलकम उभारणी

पंचप्रण शपथ

३. वसुधा वंदन

४. वीरोंका नमन

५. ध्वजारोहण व राष्ट्रगान जसे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहेत .

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी प्रेम,जनजागृती,आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योद्ध्यांच्या समर्पणाचे स्मरण व्हावे,याकरिता विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात महानगरपालिके अंतर्गत सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये या अभियानाबाबत जनजागृती करून खालीलप्रमाणे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

The program will be planned as part of the concluding activities of the “Meri Mitti, Mera Desh” campaign: Azadi ka Amritmahotsav program in Nashik municipal area.

१) पंचप्रण शपथ घेणे:-

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्याकडून पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या दिव्यांची पुरेशी व्यवस्था शाळास्तरावर करण्यात येणार आहे. शपथ घेतानाची सेल्फी https://yuva.gov.in/meri_maati_mera desh या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे.या संकेत स्थळावरील Teke Pledge या बटणावर क्लिक करून डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते .तसेच सदर प्रमाणपत्र समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येणार आहे. त्या करिता जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

हे ही वाचा

आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल ! काय AI लेखन क्षेत्रातील लोकांना ही ठरणार उपयोगी ?

२) स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन:-

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त ( आर्मी, पोलीस दल) स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी स्थानिक पध्दतीनुसार सन्मान (शाल, बुके, श्रीफळ देवून) करण्यात येणार आहे.

(३) पालक सभा आयोजन:-

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर “मेरी मिट्टी, मेरा देश” या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी शाळास्तर पालक सभा आयोजित करण्यात येऊन याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

४) ध्वजारोहण कार्यक्रम:-

> शाळा स्तरावर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे .

> महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे.

> संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक सन्माननीय नागरिक, युवक मंडळे, महिला बचत गट, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल.

> या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परीसरातील १२ मूठ माती घेवून सन्मानपूर्वक स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. (सविस्तर सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच कळविण्यात येणार आहे.)

>हा सर्व उपक्रम राबविणेबाबत कृती आराखडा कार्यक्रमाआधी शाळा व्यवस्थापन समितीची विशेष सभा / बैठक घेवून याबाबतचा ठराव शाळा स्तरावर करण्यात येणार आहे.

* दि. १३ ते १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे ‘हरघर तिरंगा’ हा उपक्रम राबवून, प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविणे बाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक नागरिक यांना प्रभात फेरी दरम्यान आवाहन करण्यात येणार आहे.

. १५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे नियमित झेंडावंदन असेल.

हे ही वाचा

महानोकरभरती जाहिरात | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जाहिराती फक्त एकाच ठिकाणी | अर्ज करा.

५) सांकृतिक कार्यक्रम :-

> शाळास्तर १५ ऑगस्टला रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे .

> चित्रकला, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, काव्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, पथनाट्ये अशा विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

६) वसुधा वंदन:-

> देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यावर शालेय परिसरात स्थानिक स्वातंत्र्यसैनिक, प्रतिष्ठीत नागरिक यांच्याकडून वृक्षरोपण करून घेण्यात येणार आहे.

> लागवडीसाठी देशी प्रजातीची रोपे वनविभागाकडून प्राप्त करून घेण्यात येणार .

सर्व केंद्रप्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत आपल्या शाळेतील दि.०९ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतलेल्या उपक्रम, सांकृतिक कार्यक्रम व स्पर्धांची माहिती दि. २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत हार्ड कॉपी स्वरुपात, समग्र शिक्षा अभियान – १, कार्यालय पोलीस • मुख्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथे सादर करण्यात येणार आहे. वरील सर्व उपक्रमाची विविध प्रचार माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार .मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा.बी.टी.पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात वरील सर्व मुद्द्यांचा समावेश आहे.

Leave a Comment