नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.

नाशिक मनपा शाळा मध्ये विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.विविध दिन,जयंत्या,पुण्यतिथ्या,सण,उत्सव असे विविध उपक्रम शाळामध्ये नेहमी साजरे करण्यात येतअसतात. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात पार पडला. World Adivasi Day was celebrated with great enthusiasm in the schools of Nashik Municipal Corporation Education Department.

हे ही वाचा

आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल ! काय AI लेखन क्षेत्रातील लोकांना ही ठरणार उपयोगी ?

शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी असल्याने सदर कार्यक्रम 8 ऑगस्ट 2023 रोजी शालेय वेळेमध्ये पार पडला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये आदिवासी संस्कृतीचा गौरव म्हणून अनेक उपक्रम घेण्यात आले. मनपा शिक्षण विभागातील सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन हा समृद्ध दिवस आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आवाहन प्रत्येक वर्षी करण्यात येत असते . World Adivasi Day was celebrated with great enthusiasm in the schools of Nashik Municipal Corporation Education Department.

आदिवासी समुदायाचे योगदान साजरे करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न केले. या कार्यक्रमात संपूर्ण मनपा शाळांमध्ये पारंपरिक कला, संगीत आणि नृत्य यांचे प्रदर्शन करण्यात आले. आपला समाज बनवणाऱ्या आदिवासी संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला. या उत्सवाद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या सामुहिक इतिहासाला आकार देण्या-या निसर्गातील रहिवासी असणाऱ्या लोकांच्या अमूल्य भूमिकेबद्दल दर्शन घडवल्याबद्दल शाळेतील वरिष्ठांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

हे ही वाचा

महानोकरभरती जाहिरात | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जाहिराती फक्त एकाच ठिकाणी | अर्ज करा.

मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारक शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता . त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धा, वारली चित्रकला स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धा इत्यादी घेण्यात आलेल्या होत्या. प्रत्येक स्पर्धेतून क्रमांक ही काढण्यात आले व विजेत्यांना पेन व खोडरबर बक्षीस म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमाला मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगरचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन केले. 

हे ही वाचा

आपले आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करा | आधारकार्ड फ्री अपडेट कसे कराल ? शेवटची तारीख जाहीर ! Uidai my Aadhaar.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले. शाळेचे सर्व शिक्षक अर्थात लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, नामदेव जानकर, संतोष महाले आणि सुरक्षारक्षक उमेशकांत निकम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर आपल्या वर्गातील इतर तयारी सुद्धा शिक्षकवृंदांनी केलेली होती. मनपा शिक्षण विभागातील सर्व शाळांनी याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला होता. मनपा शिक्षण विभागातील सर्व शाळा सोशल मीडियावर आपल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात, त्या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून येते.

हे ही वाचा

नाशिक जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरु |जाहिरात निघाली | लिंक |Onlineअर्ज सादर करण्याचे वेळापत्रक संपुर्ण माहिती.

Leave a Comment