महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत येणारी सातपुर मधील मनपा शाळा क्रमांक 33 महादेवनगर या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रशासन, महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार शाळांमध्ये विविध उपक्रम पार पडले.Mahadev Nagar Municipal School in Satpur celebrated Independence Day with great enthusiasm.
हे ही वाचा
स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीतल अहिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिक शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मा.नगरसेवक योगेश भाऊ शेवरे,मा.नगरसेविका सौ.दीक्षाताई लोंढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रसाद झोंबाड,अरुण भाऊ काळे,विजय अहिरे, संजय तायडे, संदीप शिंदे, छाया तेलुरे, सुनंदा खरोटे,अजिंक्य तेलुरे उज्जीवन पतसंस्था उपेंद्रनगर, माता पालक गट आणि बहुसंख्येने महादेव नगर आणि सातपूर भागातील नागरिक उपस्थित होते.Mahadev Nagar Municipal School in Satpur celebrated Independence Day with great enthusiasm.
हे ही वाचा
धृवनगरच्या शाळेतील मा.दिनकर आण्णा पाटील यांचे संपुर्ण भाषण ; शाळेस बांधुन देण्यात येणार वर्गखोली
महानगरपालिका शाळा क्रमांक 33 महादेवनगर येथे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध वेशभूषा केलेली होती. शाळेचे विद्यार्थी व संपूर्ण शिक्षकवृंद यांच्याकडून परिसरातून प्रभात फेरी विविध घोषणेसह काढण्यात आली. भारतमातेच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. प्रभात फेरीनंतर विविध उपक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात आले. यामध्ये मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य सादर करण्यात आले. त्याचबरोबर “मेरी मिट्टी, मेरा देश” पंचप्रण शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर बालसभेची स्थापना व त्याचा शपथविधीही घेण्यात आलेला होता.
सर्व मान्यवरांच्याकडून यावेळी एक मूठ माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली व ती माती एका कलशात एकत्र करण्यात आली. विद्यार्थ्यानी अनेक सुंदर नृत्ये सादर केली. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांकडून या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस ही जाहीर करण्यात आले. शुभम शिवाजी पाईकराव याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या सुंदर भाषणाचे कौतुक करण्यात आले.
हे ही वाचा
मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सौ सुनंदा खरोटे व अजिंक्य तेलुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन रवींद्र पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्पावती मेतकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी अर्थात भगवान सोनार, संजय सोनवणे, मंगला शेलार, उज्वला आहेर, प्रमिला अहिरे, काजल अहिरे, जितेंद्र प्रभाळे, दत्तात्रय वाळके यांनी सहकार्य केले.