धृवनगरच्या शाळेतील मा.दिनकर आण्णा पाटील यांचे संपुर्ण भाषण ; शाळेस बांधुन देण्यात येणार वर्गखोली.

आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. वार्डाचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकर आण्णा पाटील, नगरसेवक रवींद्र धिवरे, लता काकु पाटील,अमोल भाऊ पाटील आणि इतर ही मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ध्वजारोहन मा. नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. मा. दिनकर आण्णा पाटील यांच्या हस्ते भारत भुमीच्या प्रतिमेस श्रीफळ अर्पण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत संचलनासह करण्यात आले. मुलांनी तिरंगा रंगसंगतीच्या वेशभूषेमध्ये संचलन केले आणि मान्यवरांचे औपचारिक स्वागत केले.

वार्डाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आण्णा पाटील यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले, ते संपूर्ण भाषण या ठिकाणी खाली देत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या आपणास प्रथम शुभेच्छा. शाळा क्रमांक 22 मध्ये आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून ध्वजारोहन रवींद्र धिवरे यांच्या हस्ते झालेले आहे. लता पाटील,अमोल पाटील,सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व ज्येष्ठ नागरिक संघ,आपण सर्व पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी. शिक्षकांनी आज खूप छान नियोजन केलेले आहे, परंतु अजून एका माध्यमिक शाळेतील मुलं आमची वाट बघत आहेत.

खरंतर स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही.आपल्या अनेक सैनिकांनी,देशभक्तांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले आहे. यापुढे ही हा देश अखंड राहावा, हा देश विकसित करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी, त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी यापुढे ही प्रयत्न करत रहावे लागणार आहेत.आपण सर्वांनी जातीभेद, धर्मभेद न करता ,धर्मवाद न करता यापुढे ही आपण असेच एकत्र राहू या.. या शाळेतील शिक्षकांनी खूप छान नियोजन केले.त्यांना ही धन्यवाद देतो.

आलेल्या सर्व पालकांचे मनापासुन स्वागत करतो. सर्वांना या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. ही सर्व लहान मुले आहेत. अजून महापालिकेची माध्यमिक शाळा राहिली आहे. मनपा शाळा क्र . 20 आणि 21 नंबर शाळेत थोडा वेळ लागला. त्या ठिकाणी जवळजवळ 2000 मुले शिक्षण घेतात. आपल्या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या 90 शाळा आहेत. ९० शाळेत 25000 मुले शिकत आहेत. 31 प्रभागापैकी आपल्याच प्रभागातून 3000 मुले महानगरपालिकेच्या शाळेत शिकत आहेत.याचे श्रेय प्रभागातील शिक्षकांचे आहे.

दिपके ताईंनी सांगितले की, या ठिकाणी रूम बनवायचा आहे.अमोल पाटील रूम बनवुन देणार आहे. काळजी करू नका. अमोल पाटील हा नेहमी अग्रेसरच असतो.अमोल पाटीलने आज सर्व मुलांना बिस्किटे आणलेली आहेत. सर्व शाळांमध्ये अमोल पाटीलने बिस्किटे वाटलेली आहेत. तुम्ही सर्व मुले अमोल दादाला ओळखता का ? कुठे आहे अमोल दादा ? साळुंके म्हणत आहेत, आण्णांना एक वेळ मुले ओळखणार नाहीत, पण अमोल दादांना ओळखतील.

आज मला खरंच आनंद वाटला सर्व युवक, मुले आले आहेत .या मुलांसाठी टाळ्या वाजवा. खरं तर ध्रुवतारा मित्र मंडळाला ज्येष्ठ नागरिकांनंतर त्यांनाच काम बघायचे आहे, ही मुले तयार झालेली आहेत. खूप छान कार्यक्रम घेतात.सार्वजनिक कामात सर्वांना एकत्र करण्याचं काम ध्रुवतारा मित्र मंडळ करत असते. धृवनगर म्हंटल्यावर झिरो क्राईम. भांडण नाही, तंटा नाही सर्व नागरिक एकत्र राहतात.खूप मोठ्या प्रमाणावर धृवनगर वाढत आहे.

जसे सावरकरनगरचे नाशिक मध्ये नाव होते,तसेच ध्रुवनगर हे नाव आज दैविका मध्ये,लोकांमध्ये आहे, असेचं नाव कायम ठेवूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व पालकांसह,ज्येष्ठ नागरिकांसह आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत. आवाज द्यायचा आहे, भारत माता की….. जय ! वंदे !….. मातरम ! …..वंदे !….मातरम !!

धृवनगर येथील जेष्ठ नागरिक खैरनार काका आपल्या मुलाच्या स्मरणार्थ मनपा शाळा क्र .२२ मध्ये मुलांना साहित्य वाटप राष्ट्रीय कार्यक्रमाला न चुकता करत असतात.यावेळीही त्यांनी शाळेतील मुलांना साहित्य वाटप दिनकर आण्णा पाटील,लता काकू पाटील,रविंद्र धिवरे यांच्या शुभ हस्ते केले.ध्रुवतारा मित्र मंडळाकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.त्याचबरोबर काही पालकांकडून ,बचत गटाकडून ही खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या नियोजनामागे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले. कार्यक्रमाला सहकार्य उपशिक्षिका लता सोनवणे ,कल्पना पवार, दिपाली काळे,उपशिक्षक नामदेव जानकर, संतोष महाले आणि सुरक्षारक्षक उमेशकांत निकम यांचे लाभले. आभार प्रदर्शन उपशिक्षिका दिपाली काळे यांनी केले.

Leave a Comment