सावित्रीबाई फुले म.न.पा शाळा क्र.७८ (ISO मानांकित) शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न : नाशिक म.न.पा. शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,त्यांच्या कला गुणांना वाव मिळवा आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडावे हा या मागचा हेतू असतो.
हे ही वाचा : नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 व 87 पाथर्डीगाव चे NMMS परीक्षेत भरघोस यश
सावित्रीबाई फुले म.न.पा शाळा क्र.७८ (ISO मानांकित) शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ अतिशय उत्साहात,दिमाखात, जल्लोषात व पालक, ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग (ISO मानांकित) सावित्रीबाई फुले,म.न.पा शाळा क्र.७८,(मुली)अंबडगाव, नाशिक शाळेतील विद्यार्थीनींच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ आयोजित केला जातो. या वर्षी सन २०२३-२४ च्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक १०/०२/२०२४ रोजी सायंकाळी ५ ते १० यावेळेत शाळेतील मुख्य प्रांगणात अतिशय दिमाखात,उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले.
हे ही वाचा : लेक लाडकी : ही योजना काय आहे जाणून घ्या
कार्यक्रमाची सुरुवात प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन,सरस्वती व नटराज पुजनाने झाली. शाळेच्या वतीने प्रशासनाधिकारी यांचे स्वागत सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली ठोके, संजय मोरे व शिक्षक सेना मनपा अध्यक्ष राजेश दाभाडे यांनी शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला.
कार्यक्रमास माजी नगरसेविका मंदाताई दातीर, माजी मनपा सभागृह नेते दिलीपभाऊ दातीर,अनुसयाताई दोंदे,रामकृष्ण दातीर,शरदभाऊ दातीर,नाशिक शहर पोलिस वाहतूक आयडॉल सचिनजी जाधव,विष्णुभाऊ फडोळ,अंबड न्युज चॅनलचे उत्तमराव मटाले,रावसाहेब मते,राजाभाऊ गायकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंदरभाऊ शिंदे,विजय कडाळे, केंद्रसमन्वयक विजय कंवर, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली ठोके, संगिता निकम, मनसे शिक्षक सेना मनपा अध्यक्ष सुरेश खांडबहाले, आदिवासी शिक्षक संघटना मनपा अध्यक्ष धर्मेंद्र बागुल, शिक्षक समिती मनपा अध्यक्ष पदमाकर बागड, शिक्षक सेना महिला आघाडी प्रमुख उज्वला पवार,शिक्षक सेना मनपा कोषाध्यक्ष जयंत येवला, इ.अतिथी उपस्थित होते.
हे ही वाचा : इयत्ता 5 वी व 8 वी वर्गासाठी मूल्यमापना बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती
इ.१ ली ते इ.७ वी च्या विद्यार्थींनींची अतिशय सुंदर व बहारदार असे एकुण २५ नृत्याविष्कार सादर करण्यात आले. शाळेतील गुणवंत विद्यार्थींनी यांना प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन बक्षिस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थींनी यांनी कार्यक्रमाची केलेली तयारी, उत्कृष्ट आयोजन, नियोजनासाठी सर्वांचे कौतुक करून विद्यार्थींनीच्या कलागुणांना बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले. शाळेविषयी गौरवोद्गार काढुन विद्यार्थींनींना व उपस्थित पालकवर्गास अनमोल असे मार्गदर्शन केले.
एल.ई.डी. लाईटच्या रंगीबेरंगी प्रकाशझोतात, शार्पीच्या नयनरम्य आकाशवेधी किरणांनी, डि.जे.च्या सुमधुर आवाजात, स्मोकर व ब्लास्टरच्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारातुन एखाद्या कॉन्व्हेंट स्कुलच्या कार्यक्रमाच्या तोडीस तोड असा कार्यक्रम अतिशय जल्लोषात शाळेत संपन्न झाला.रात्री १० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.
वार्षिक स्नेह-संमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजेश दाभाडे व दिपाली चंद्रात्रे यांनी केले.
कार्यक्रमास संजय मोरे.विक्रम नागरे, अशोक देवरे,सतिश बच्छाव, नितीन वाजे,रविंद देवरे,हिरामण चव्हाण,माणिक मोरे,सुरेखा महाजन,सुनिता दशपुते,रंजना मांडे, हेमलता राखोंडे,भारती खैरनार, इ.शिक्षकवृंद तसेच डी.मार्ट.च्या प्राची माळी व शिक्षिका, मातापिता पालक, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.