राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी बाबासो जानकर यांची निवड
Table of Contents
नुकतीच झालेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हा बैठकीमध्ये उपशिक्षक बाबासो पंडा जानकर यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसे निवडपत्र ही प्रदान करण्यात आले.Selection of Babaso Jankar for Sangli District Post of Maharashtra Backward Class Teacher Parents
हे ही वाचा
शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक,जत येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनेच्या नवीन पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये बाबासो पंडा जानकर यांची संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी इतर ही पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या.
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत.
बाबासो पंडा जानकर हे एक जेष्ठ शिक्षक असून त्यांची शिक्षण क्षेत्रातील आजवरची कामगिरी नेहमी उल्लेखनीय राहिलेली आहे.आजपर्यंत इतर ही शिक्षक संघटनेमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्याबरोबर सामाजिक कामाच्या अनुभवाची मोठी शिदोरी आहे.Selection of Babaso Jankar for Sangli District Post of Maharashtra Backward Class Teacher Parents
रायगड जिल्हा परिषदे मध्ये त्यांनी जवळजवळ 25 वर्षे सेवा केली आहे, तिथे ते मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असणारे बाबासो जानकर हे नेहमी कार्यतत्पर असतात. विद्यार्थीप्रिय व समाजप्रियतेच्या सर्व निकषात बाबासो जानकर बसतात, हे त्यांच्या रायगड जिल्हा परिषदेच्या सेवेतील अनुभवावरून त्यांचे निकटवर्तीय नेहमी बोलत असतात.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह.
संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न व अडचणी सोडवणे हे माझे पहिले कर्तव्य असेल व या पदाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे माध्यमाशी बोलताना ते म्हणाले. बाबासो पंडा जानकर हे जि.प. शाळा खलाटी या शाळेतील विदयार्थी प्रिय व समाजभिमुख शिक्षक आहेत.त्यांचे गाव हे शिंगणापूर असून आजवर अनेक सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला आहे.या ही पदास ते योग्य न्याय देतील यात शंका नाही.