शिवजयंती : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत मोठ्या उत्साहात शिवजयंती संपन्न या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हे ही वाचा: इयत्ता 5 वी व 8 वी वर्गासाठी मूल्यमापना बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती
इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषणे केली. त्याचबरोबर महाराजांचा पाळणा गायन करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी कोणते मोठे कार्य केले याबाबत भाषणामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उल्लेख करून महाराजांचा जयजयकार केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती होती यावर भाष्य विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून केले. महाराजांनी रयतेचा, स्वराज्याचा कारभार कशा पद्धतीने पाहिला, चालवला यावर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भाष्य केले. मुलांना खाऊ म्हणून फरसाण वाटप करण्यात आले.
हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 86 व 87 पाथर्डीगाव चे NMMS परीक्षेत भरघोस यश.
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी अभिवादन केले. सर्वच शिक्षक आणि शिक्षिका यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि अभिवादन केले. सर्व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ह्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका दिपाली काळे आणि कल्पना पवार यांनी केले.
हे ही वाचा: सावित्रीबाई फुले म.न.पा शाळा क्र.७८ (ISO मानांकित) शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक,मुख्याध्यापक सोनजी गवळी, लता सोनवणे,कल्पना पवार, दिपाली काळे, नामदेव जानकर,संतोष महाले आणि ईश्वर चौरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.