SIR Mapping maharashtra मतदार यादीतून नाव कट होण्याअगोदर हे काम करा या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
महाराष्ट्रामध्ये लवकरच SIR Mapping चालू होत आहे.SIR म्हणजे Special Intensive Revision. यामध्ये बऱ्याच लोकांची नावे मतदार यादीतून नाहीशी होऊ शकतात. हे होऊ नये यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ? याविषयी सविस्तर माहिती या उताऱ्यामध्ये पाहूया.
या मोहिमेमध्ये मतदार याद्या अपडेट होत असतात. यामध्ये काही डुप्लिकेट नावे असू शकतात तेही वगळले जाऊ शकतात. मतदारांचे व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करण्यात येत असते. 2002 यादीमधील आई -वडील किंवा आजी आजोबा यांचे नाव जर मतदार यादीत असेल, तरत्यांच्या मुलांची आणि नातवांची नावे या नावाशी Mapping केली जातात. बिहारमध्ये SIR ही मोहीम या अगोदर पार पडलेली आहे.त्यामध्ये बहुतांश मतदार यादीतील नावे कमी झालेली आहेत.
हे ही वाचा: दि. २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत साधना सप्ताह
ज्यांचे आई वडिलांचे नाव २००२ मधील मतदार यादीत नाहीत त्यांचे नाव मैप होणार नाही.अशा मतदारांचे व्हेरिफिकेशन होईल.त्याना कागदपत्रे सादर करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही नावे अपडेट सुद्धा केली जाऊ शकतात म्हणजे काही जणांचे नाव याच्यामध्ये डबल आलेले असेल किंवा डुप्लिकेट सुद्धा असू शकते , काही नवीन मतदार आहेत ज्यांना यादीमध्ये ऍड करायचे असते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एसआय मॅपिंग प्रोसेस सुरू झालेली आहे.
मॅपिंग ही पहिली फेज असणार आहे, तर दुसरी फेज आहे SIR ची ही आता सुरू होणार आहे .महाराष्ट्रात २००२ साली SIR झालेले होते.
2002 चे जे काही मतदार यादी आहेत त्या सर्व मतदार याद्या चेक केल्या जातील आणि जे नवीन मतदार आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये ॲड केले जातील 2002 चे जे काही मतदार यादी असतील त्याच्यामध्ये सुद्धा नाव चेक केलं जातील नवीन प्रोसेस नुसार याद्या बनवल्या जातील. नवीन त्यांना ऍड व्हायचे ते सुद्धा यामध्ये 2002 च्या ज्या काही यादी आहे त्याचा रेफरन्स घेतला जाणार आहे.
2002 च्या यादीमध्ये नावच नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म फिलिंग करावे लागेल. आणि ते एप्रिल पासून फॉर्म फिलिंग सुरू होईल ते BLO तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि तुम्हाला त्यावेळेस कागदपत्र सुद्धा द्यावे लागतील. त्या नंतर SIR Mapping मध्ये तुमचे 2002 च्या ज्या काही याद्या आहे ती अगोदर डाऊनलोड करायची त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर ते नाव तुम्ही काढायचं आणि आत्ताच्या जर यादीत नाव आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचं आणि दोन्ही यादीतलं नाव लक्षात ठेवा.
हे ही वाचा: BLO शी संपर्क साधण्यासाठी सोपी युक्ती | Call book करा अशा पद्धतीने
तुम्हाला फॉर्म फिलिंग करावे लागेल आणि ते एप्रिल पासून फॉर्म फिलिंग सुरू होईल हे BLO प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि तुम्हाला काय करायचंय तर SIR Mapping मध्ये तुमची 2002 च्या ज्या काही याद्या आहेत त्या अगोदर डाऊनलोड करायची त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर ते नाव तुम्ही काढायचं आणि आत्ताच्या जर यादीत नाव आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचे. दोन्ही यादीतले जे नावे असतील ते आत्ताच्या यादीतलं आणि 2002 च्या हे तुम्हाला सगळे whatsapp ला तुम्ही पाठवू शकता किंवा त्यांच्याकडे तुम्ही तेच जमा सुद्धा करू शकता.
त्याच्यानंतर ते BLO तुमची माफी करतील हे झालं SIR Mapping आता हे कशा पद्धतीने करायचं 2002 ची यादी कशी पाहायची? त्यानंतर आताच्या मतदार यादी मध्ये नाव कसं पाहायचे? हे आता आपण पाहू

SIR मॅपिंग करण्यासाठी step by step information:-
1. सर्वप्रथम Play Store वर जाऊन ECINET नावाची ॲप इंस्टॉल करून घ्यावे.
2. ॲप ओपन केल्यावर दहा पर्यायी बॉक्स दिसतील. त्यातील दोन नंबरच्या पर्यायी बॉक्स वर क्लिक करा.
3. जो Search Your Name in Last sir आहे यावर क्लिक करा.
4. राज्य, जिल्हा,मतदार संघ, मतदान केंद्र आणि नाव, यादी भाग, मतदाराचे पूर्ण नाव ही सर्व सविस्तर माहिती भरायची आहे.
5. यातील पूर्ण माहिती माहित असेल तर टाकावी किंवा काही महत्त्वाची माहिती असेल तरी इथे चालू शकते आणि search करू शकता.
6. हे सर्च केल्यावर जर तुमचे नाव नसेल तर तुमचे वडील आई किंवा आजी आजोबा यांचे नाव तुम्ही search करून बघू शकता.
7. सर्च केल्यानंतर मतदार यादी येईल या मतदार यादी मध्ये आपल्या ला अपेक्षित असलेले नाव याचा screenshot काढून घ्यायचा आहे.
8. यानंतर आपल्याला जायचे आहे सहा नंबरच्या पर्यायी बॉक्सवर. जो Search Your Name in Voter List आहे. यावर क्लिक केल्यावर आपल्याला सर्च करण्याचे चार ऑप्शन दिसतील. त्यातील एकाचा वापर करून आपण माहिती सर्च करायची आहे.
9. सर्च केल्यावर आपणास आत्ताच्या यादीमधील सर्व डिटेल्स दिसतील. याचा एक स्क्रीन शॉट आपण काढून घ्यायचा आहे.
10. यानंतर आपणास पर्यायी बॉक्स नंबर आठ वर जाऊन क्लिक करायचा आहे.
11. पर्यायी बॉक्स नंबर connect with election official हा आहे. यावर क्लिक केल्यावर Know your BLO पर्याय येईल यावर क्लिक करा.
हे ही वाचा: 2002 मतदार यादीशी आपले नाव मॅप झाले आहे का ? विशेष मोहीम
येथे तुम्हाला BLO यांचा मोबाईल नंबर दिसेल त्यावर आपण संपर्क करायचा आहे आणि जे आपल्याला डिटेल आता आपण ऑनलाईन काढलेले आहेत. स्क्रीन शॉट च्या स्वरूपात ती त्यांना व्हाट्सअप वर पाठवायचे आहेत. यानंतर तुमचं नाव BLO ॲप मध्ये मॅप केले जाणार आहे. अशा पद्धतीने आपले नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये यासाठी आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.






