राज्य अभ्यासक्रम आराखडा : 2024 मसुद्यावर पालकांनी आणि शिक्षकांनी प्रतिक्रिया नोंदविणे
इयत्ता ३री ते १२वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात येत आहे.
हे ही वाचा: सुवर्णसंधी : नवोदय विद्यालय समितीकडून 1377 पदांची भरती
तरी आपल्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सदर मसुद्याचे वाचन करून स्वतंत्ररित्या आपले अभिप्राय नोंदविणेबाबत आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच आपले कार्यालयांत यावर चर्चा घडवून आणून कार्यालयाचे संकलित अभिप्राय सोबत दिलेल्या लिंकवर नोंदवावेत. सदर मसूदा अनय् विभागाच्या शासकीय कार्यालयांचेही निदर्शनास आणून त्यांना प्रतिक्रिया देणेबाबत कळवावे.
हे ही वाचा: गणेश लोहार यांनी केली तब्बल सात वेळा नर्मदा परिक्रमा.
यासोबतच, आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षक, पालक, शैक्षणिक प्रशासक, शिक्षण अभ्यासक, सामान्य नागरिक यांनी मसुद्याचे वाचन करून स्वतंत्ररित्या आपले अभिप्राय खाली देण्यात आलेल्या लिंकवर नोंदविणेसाठी सदर लिंक सर्व संबंधितांचे निदर्शनास आणून द्यावी. सोबतचे प्रसिद्धी निवेदन कार्यालयात दर्शनी भागात डकवावे.
अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक २३/०५/२०२४ ते ०३/०६/२०२४
अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK https://forms.gle/TDHL9z8harzRgJoy5