हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार |

हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण व नियोजन याविषयी सविस्तर वृत्तांत

”हरितकुंभ” संकल्पनेचे उद्दिष्ट प्रदूषण कमी होणे, हवामान बदलाचा मुकाबला करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये जनजागृती करणे हे ही सर्वात मोठी उद्दिष्ट आहे. या संकल्पनेतून वृक्षारोपण राबविण्यात येणार आहे. ”हरित” या शब्दाचा अर्थ पर्यावरणाशी संबंधित आहे आणि ”कुंभ” या शब्दाचा अर्थ लोकांचा मोठा मेळावा होय.”हरितकुंभ” म्हणजे एकत्र येऊन पर्यावरण पूरक कार्य करणारा उपक्रम जसे की वृक्षारोपण.

हरितकुंभ या संकल्पनेतून अनेक उद्दिष्ट साध्य करता येतील. त्यात वाढते प्रदूषण रोखणे,भूक्षय व जलसंकट कमी करणे,जैवविविधतेचे रक्षण,हरित पट्टा तयार करणे,भावी पिढ्यांना शुद्ध वायू, सावली व निसर्गसंपत्ती देणे व पर्यावरणाचा समतोल राखणे हे आहेत. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.

हे ही वाचा: गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात !

हरितकुंभ संकल्पनेत सात नियोजनाचे टप्पे

  • सर्वेक्षण व नियोजन
  • झाडांची निवड
  • वृक्षारोपण दिन ठरवणे
  • भागीदारी व सहभाग
  • सातत्यपूर्ण देखभाल
  • मूल्यांकन

सर्वप्रथम सर्वेक्षणाचे नियोजन येते. कोणत्या भागामध्ये हवामानानुसार व जमिनीच्या प्रकारा नुसार कोणती झाडे लावता येतील याचे सर्वेक्षण या संकल्पनेतून केले जाणार आहे.

यानंतर झाडांची निवड कशा प्रकारे करावे हे देखील सर्वेक्षणातून समजते. स्थानिक, देशी व बहुउपयोगी वृक्ष जसे की आंबा, बदाम, जांभूळ, बकुळ, करंज, पिंपळ, वड इत्यादी. यात महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपण दिन ठरवणे हे असते. सध्या पावसाळ्याची सुरुवात जून जुलै या काळात होते. झाडे लावण्यासाठी पावसाळा हा ऋतू उत्तम असतो.

हे ही वाचा: डिजिटल जनगणना : केंद्र सरकार द्वारे दोन टप्प्यात करण्यात येणार

हरितकुंभ संकल्पनेत सामूहिक सहभागासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या मुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर राहतो.या संकल्पनेमध्ये अनेक भागीदारी असतात व यात सहभाग देखील मोठ्या प्रमाणात घेतला जातो जसे की शाळा, ग्रामपंचायत, महाविद्यालय, विद्यार्थ्यांचे, जनतेचे व स्वयंसेवी संस्थांचे सहभाग असते.

झाडे लावल्यानंतर झाडांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. काळजी घेतली नाही तर झाडांची व्यवस्थित वाढ होत नाही, यामध्ये झाडांना पाणी देणे, झाडाचे संरक्षण व्हावे म्हणून कुंपण लावणे. झाडांना वेळोवेळी खत देणे. याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक समिती वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत असतात. वृक्षसंवर्धन व्हावे झाडांची संख्या वाढावी यासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित करणे आवश्यक असते.

हे ही वाचा: Aashadhi ekadashi : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन

हरित कुंभ संकल्पनेत सर्वेक्षणात किती झाडे लावली, किती झाडे जगली याचा अहवाल तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. ज्या वृक्षांची वाढ यशस्वीरित्या होते, त्या वृक्षांची नोंद घेणे. ज्या ठिकाणी वृक्षांची वाढ होत नाही यांची देखील नोंद घेऊन पुढील वर्षी सुधारणा करता येऊ शकते.

‘हरितकुंभ’ ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम नसून, ती एक सामाजिक चळवळ आहे. आपण सर्वांनी मिळून निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना एक सुंदर पर्यावरण भेट द्या.

हे ही वाचा: जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम जुना आणि नवीन ! या विषयी माहिती

सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा यास अनुसरून ‘हरितकुंभ’ या संकल्पनेतंर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यावस्थापनांच्या शाळांनी दि. १६ जुलै २०२५ रोजी वृक्षारोपणाचे नियोजन करावे असे परिपत्रक आहे. तसेच शाळांना आवश्यक संख्येनुसार रोपे आपल्या जवळच्या मनपाच्या विभागीय कार्यालयातून प्राप्त करून घ्यावीत असे परिपत्रकात म्हंटले आहे. तसेच खालील मुद्यांनुसार सविस्तर माहिती सोबत देण्यात आलेल्या लिंकमध्ये सादर करावी असे परिपत्रकात नमूद आहे.

१. आपल्या शाळेतील वृक्षारोपणाची एकूण संख्या व त्यांचे संगोपन कोणत्या प्रकारे केले जाणार आहे याची संख्यात्मक माहिती.
२. वृक्षारोपण कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे व त्याचे स्थळ स्पष्टपणे नमूद करणे..
३. दि. १६ जुलै २०२५ रोजीच्या अहवालासाठी वृक्षारोपण संबंधित GPS फोटो (Before व After) तयार ठेवावेत.

Leave a Comment