UPS योजना होणार लागू 1 एप्रिल पासून याविषयी सविस्तर वृत्तांत
Table of Contents
केंद्र सरकार १ एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme) सुरू करणार आहे, ही पेन्शन सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न हवे असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
एनपीएस अंतर्गत आधीच नोंदणीकृत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच यूपीएस योजना लागू असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएस यापैकी एक निवडण्याचा पर्याय असणार आहे. २४ जानेवारी रोजी सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) ला पर्याय म्हणून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) ची अधिकृत घोषणा केली होती आणि आता ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू केली जाणार आहे.
हे ही वाचा: उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना
युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) म्हणजे काय?
UPS म्हणजे काय? हे थोडक्यात समजून घ्या… निश्चित पेन्शन केंद्रीय कर्मचाऱ्यांना यूपीएस योजनेअंतर्गत दिली जाईल.यूपीएस पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वीच्या गेल्या १२ महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या ५०% असेल. यूपीएस पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान २५ वर्षे सेवा करावी लागेल.
जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला निश्चित पेन्शन देखील मिळत राहील, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतननातून मिळणाऱ्या पेन्शनच्या 60 टक्के असेल. याशिवाय, किमान खात्रीशीर पेन्शन देखील दिली जाईल, म्हणजेच १० वर्षे काम करणाऱ्या लोकांना किमान १०,००० रुपये पेन्शन यूपीएस योजनेअंतर्गत मिळणार आहे.
हे ही वाचा: आयुष्यमान कार्ड काढलं का ? शेतकऱ्यांनो !
सरकारचे योगदान किती असेल?
युनिफाइड पेन्शन स्कीम अंतर्गत इंडेक्सेशन देखील जोडले गेले आहे. याचा अर्थ असा की निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन महागाईनुसार वाढत राहील. ही वाढ महागाई भत्त्याच्या रूपात पेन्शनमध्ये जोडली जाईल. हे औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-W) च्या आधारे मोजले जाईल निवृत्तीनंतर एक रक्कमी देखील दिली जाईल.
नवीन पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) कर्मचाऱ्यांना त्यांना मिळणाऱ्या पगारातून दहा टक्के योगदान दिले जाते आणि या पेन्शनमध्ये सरकारचे योगदान 40% असेल. त्याच वेळी, १ एप्रिल २०२५ पासून लागू होणाऱ्या यूपीएसमध्ये सरकारचे हे योगदान कर्मचाऱ्याच्या मळ पगाराच्या १८.५ टक्के असेल या Unified Pension Scheme योजनेच्या महागाईनुसार पेन्शन वाढेल.
हे ही वाचा: जुन्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली
या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
यूपीएस निवडणाऱ्या लोकांना इतर कोणत्याही पॉलिसी सवलती, पॉलिसी बदल, आर्थिक लाभ मिळणार नाहीत. एनपीएस अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही अधिकृत पेन्शन योजना सरकारने २५ जानेवारी २०२५ रोजी अधिसूचित केली होती.
युनिफाइड पेन्शन स्कीम अशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असेल जे UPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत येतात आणि त्याअंतर्गत यूपीएस पर्याय निवडतात.