भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित करणेबाबत सविस्तर माहिती
Table of Contents
११ डिसेंबर २०२४ रोजी आदरणीय महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या जयंती निमित्त शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार तर्फे दिनांक ०४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत भारतीय भाषा उत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षीचा विषय आहे “भाषांच्या माध्यमातून एकता” (Unity through Languages” / “भाषाओं के माध्यम से एकता). हा उत्सव महाकवी भारती यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत अंतर्भूत असलेल्या भाषिक विविधतेचा प्रचार आणि उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.Various activities will be organized in Nashik Municipal School in connection with Indian Language Festival
हे ही वाचा : स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांवर मनपा व नपा क्षेत्रातील शाळांमध्ये बंदी
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० भाषांचे महत्त्व (मातृभाषेवर आधारित शिक्षण आणि बहुभाषिकता आणि आपल्या देशाच्या भाषिक वारशाचे मूल्य आणि अनेक भाषांबद्दल अभिमान आणि कौतुकाची भावना वाढविणाऱ्या शिक्षणासाठी एक समग्र दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देतो. जे आपला समाज समृद्ध करतात.
NEP २०२० आणि या वर्षीच्या भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने दि. ०४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रम शाळा, तालुका/केंद्र, जिल्हा व राज्य स्तरावर खालील उद्देशांच्या पूर्तीसाठी आयोजित करण्यात येत आहे.
हे ही वाचा : नाशिक मनपा धृवनगरच्या शाळेत महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी कार्यक्रम साजरा
आपली सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नागरिकांमध्ये एकता वाढवण्यासाठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये भारत्तीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे.
बहुभाषिकतेला व भारतीय भाषेतून शिक्षण आणि संशोधन यांना प्रोत्साहन देणे,
भाषाप्रेमींची नवीन पिढी तयार करणे व त्यांना प्रोत्साहन देणे,
उपरोक्त संदर्भानुसार एक आठवडा चालणाऱ्या या उत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळा, केंद्र (CRC) व तालुका (BRC) स्तरांवर “भाषांच्या माध्यमातून एकता” या विषयावर आधारित विविध उपक्रम, कार्यशाळा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित यावेत. सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ नुसार उपक्रम आयोजित करून दिनांक ०४ ते ११ या कालावधीत भारतीय भाषा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर भारतीय भाषा उत्सावांतर्गत आयोजित विविध उपक्रमांची माहिती अहवाल, फोटो संकलित करून SCERT, पुणे तर्फे देण्यात आलेल्या गुगल लिंक मध्ये भरण्यात येणार आहे. गुगल लिंक WhatsApp गटावर शेअर करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास शालेय स्तरावरून Facebook, WhatsApp व इतर समाज मध्यमावरून प्रसिद्धी देण्यात यावी असे परिपत्रकात म्हंटले आहे
तसेच राज्य स्तरावर मा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे दि. ११.१२.२०२४, रोजी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या दिवशी सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ नुसार ऑनलाईन YouTube वर मान्यवरांचे मार्गदर्शन व शिक्षणतज्ज्ञ, नामवंत लेखक / साहित्यिक यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. WhatsApp गटावर शेअर करण्यात येईल. आपल्या केंद्रातील/शाळेतील शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना या कार्यक्रमाची YouTube लिंक शेअर करून त्यांना हा कार्यक्रम YouTube वर पाहण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवावे असे परिपत्रकात म्हंटले आहे. तरी भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे परिपत्रकात म्हंटले आहे.