नाशिक मनपा धृवनगरच्या शाळेत महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी कार्यक्रम साजरा

नाशिक मनपा धृवनगरच्या शाळेत महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी कार्यक्रम साजरा याबाबत सविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची सातपूर विभागातील शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेमध्ये आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता . कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.Mahatma Jyotirao Phule’s death anniversary program celebrated at Nashik Municipal Corporation Dhruvanagar school

महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कोण कोणते प्रयत्न केले यावरही मुलांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी प्रेरणादायी गोष्टी सुद्धा यावेळी सांगण्यात आल्या. इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला होता.

हे ही वाचा : व्यक्तीचा चेहरा कसा वाचवा

महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी किती मोठे कार्य केलेले आहे, हे विद्यार्थ्यांना यावेळी सांगण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता चौथी ब कडे होते. वर्गशिक्षक संतोष महाले यांनी कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर असे आयोजन केलेले होते. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती भाषणे केलेली होती त्यातील उत्कृष्ट भाषणांना पेन आणि वही बक्षीसच्या च्या स्वरूपात विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.

हे ही वाचा : विधानसभा निवडणुका संदर्भात शाळा सुट्टी बाबत शासनाचा महत्वाचा निर्णय

आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी. यांनी मुलांना अध्यक्षीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे आपण सुद्धा थोर काम केलं पाहिजे, आपणही त्यांच्या गुणांचा अंगीकार केला पाहिजे असे त्यावेळी बोलत होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे सादर केलीच,पण शाळेतील शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मार्गदर्शन केले.

आजच्या या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी, उपशिक्षिका लता सोनवणे, तेजस्विनी बिरारी, दिपाली काळे आणि उपशिक्षक नामदेव जानकर, संतोष महाले, ईश्वर चौरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment